जिल्हयातील सहा शिक्षकांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार

रांजणगाव गणपती,  ता.१० जुलै २०१६ (सतीश केदारी) :  शिक्षणतज्ज्ञ स्व. राधारामण बाळकृष्ण देव याच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जिल्ह्यातील सहा शिक्षकांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देवून नुकतेच सन्मानित करण्यात आले.

शिक्षणतज्ज्ञ रा. बा. देव जन्मशताब्दी वर्षानिमित्त रा. बा. देव सोशल फौंडेशनतर्फे उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ नुकताच पुण्यात संपन्न झाला.याप्रसंगी कॉसमॉस बॅकेचे अध्यक्ष मिलींद काळे, ज्येष्ठ समाजसेवक मिलींद भोई, डॉ. आनंद शिंदे, मीरा थेटे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

पुरस्कार प्राप्त शिक्षकांमध्ये तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील दै. सकाळचे बातमीदार व निमगाव म्हाळुंगी येथील उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक प्रा. नागनाथ शिंगाडे, मुखई (ता. शिरूर) येथील रामराव गेणूजी पलांडे प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक सुधीर ढमढेरे, रामभाऊ म्हाळगी फौंडेशनच्या प्राथमिक विद्यालयातील मुख्याध्यापक योगेश आवेकर, न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथील शिक्षक मोहन शेटे, सावली शिक्षक प्रशिक्षण केंद्रातील मुख्याध्यापक गौरी कुलकर्णी व म. ए. सो. कनिष्ठ विद्यालय पुणे येथील प्रा. दिलीप शहा यांचा समावेश असुन या सर्वांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.तसेच अजिंक्‍य डी. वाय. पाटील विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. एकनाथ खेडकर यांचा विशेष पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. या वेळी पुस्तकी ज्ञानाबरोबरच शिक्षणात नितीमूल्यांचे धडे देणे गरजेचे आहे असे मत ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉ. प्र. ल. गावडे यांनी पुरस्कार वितरणप्रसंगी बोलताना व्यक्त केले.


या प्रसंगी शिक्षणतज्ज्ञ राधारमण देव यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याचे कौतुक उपस्थित मान्यवरांनी केले.या सोशल फौंडेशनचे विश्वस्त ऍड. मकरंद देव यांनी प्रास्ताविक केले. तर राजेंद्र देव यांनी स्वागत केले.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या