स्वयंरोजगारासाठी कौशल्य शिक्षणाची आवश्यकता

शिक्रापूर ,  ता. १६ जुलै २०१६ (प्रा.एन.बी.मुल्ला) : युवकांना रोजगार–स्वयंरोजगाराच्या उपलब्धतेसाठी कौशल्यपूर्ण व्यवसाय शिक्षणाची आवश्यकता आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य शिक्षक परीषदेचे तालुका कार्याध्यक्ष प्रा.एन.बी.मुल्ला यांनी केले.

शिक्रापूर येथील जीवनाधार केंद्रात जागतिक युवा कौशल्य दिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.एन.बी.मुल्ला बोलत होते.यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, केंद्र सरकारची कौशल्य विकास योजना ही तरूणासाठी संजीवनी आहे.व्यावसायिक व तांत्रीक शिक्षणाच्या आधारे युवकांमध्ये विविध कौशल्यांचा विकास केला जातो.

जिद्द, परीश्रम व प्रामाणिकपणा या त्रिसुत्रीच्या आधारे युवकांनी यश मिळवावे असे आवाहनही याप्रसंगी त्यांनी केले.या कार्यक्रमास योगिता म्हेत्रे, अर्पिता देशमुख, चंदन बच्छाव, सुबोध जाधव, विजय डोंगरे आदी उपस्थित होते.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या