जीव गेल्यावरच जाग येणार का?

रांजणगाव सांडस,  ता.१७ जुलै २०१६ (संपत कारकुड) : पारगाव च्या छोट्या बंधा-याला  एकाबाजुने अाधार नसल्याने अपघात घडत असुन प्रशासन जीव गेल्यावरच जागे होणार का असा संतप्त सवाल नागरिकांनी केला अाहे.

शिरुर व दौंड तालुक्याला जोडणारा दुवा म्हणुन पारगाव च्या पुलाची गणना केली जाते.भिमानदीवर असणा-या या पुलाचे दुरुस्ती चे काम सुरु असल्याने मोठी वाहतुक हि बंद केलेली अाहे.तर दुचाकी वाहनांची वाहतुक व नागरिकांना जाणे-येण्यासाठी छोट्या बंधा-यावरुन जावे लागते अाहे.

छोट्या बंधा-यावर नागरिकांची मागणी लक्षात घेत या पुर्वी संरक्षक बांबुचा अाधार दिला होता.परंतु कालांतराने हे बांबु देखील कुचकामी ठरले असुन एका बाजुचा अाधार पुर्णपुणे नाहिसा झाला अाहे.एका बाजुला कोणाताच अाधार नसल्याने नागरिकांना जीव मुठीत घेउन प्रवास करावा लागतो.त्यामुळे या पुलावरुन प्रवास करणे नागरिकांसाठी धोक्याचे ठरते अाहे.

सध्या शाळा सुरु असल्याने विद्यार्थ्यांची सतत ये-जा असते.नुकतेच  नागरगाव येथील शालेय विदयार्थ्यांचा पुलावरुन घसरल्याने अपघात घडला होता.या मध्ये विद्यार्थ्यांना कसेबसे वर काढण्यात अाले होते तर या विद्यार्थ्यांना दुखापत देखील मोठ्या प्रमाणावर झाली अाहे.त्याचप्रमाणे राञी च्या वेळेत दिसुन न अाल्याने  अपघाताचा धोका मोठ्या प्रमानावर असतो.

सध्या भिमा नदीला पाणी मोठ्या प्रमाणावर अाले असल्याने बंधा-याला मोठया प्रमाणावर पाणी अाहे. तसेच मोठ्या पुलाची दुरुस्ती अजुन सुरुच असल्याने  तात्पुरती सोय म्हणुन छोट्या बंधा-याला संरक्षक बांबु व जाळी चा अाधार देण्यात यावा असा अाग्रह पालकवर्गाने व नागरिकांनी केला अाहे.
 
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या