आर्थिक कारणावरून विठ्ठलवाडीत दोन गटांत हाणामारी

विठ्ठलवाडी,  ता.२३ जुलै २०१६ (विशेष प्रतिनीधी) : येथे उसने दिलेले पैशाच्या वादातून दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना घडली अाहे.या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, विठ्ठलवाडी येथील गणेश रमेश शिंदे यांनी त्यांच्या गावातील दत्तात्रय नारायण गवारी यांचेकडून दोन-तीन वर्षांपूर्वी दोन लाख रुपये उसने घेतले होते. यानंतर काही दिवसांनी शिंदे यांनी गवारी यांचे उसने घेतलेले पैसे पुन्हा दिले होते. परंतु शिंदे यांनी पैसे घेताना गवारी यांचेकडे स्वतःचा चेक दिलेला होता. परंतु उसने घेतलेले पैसे परत देऊनही गवारी यांनी शिंदे यांना १६ जुलै रोजी वकिलातर्फे दिलेल्या चेकवरील रक्कम न भरल्यास कारवाई केली जाईल अशी नोटीस पाठविली. यानंतर काल सकाळी डेअरीवरून दुध घालून येत असताना गवारी यांना एका जीपमधून उतरून  गणेश शिंदे,सागर शिंदे,अक्षय शिंदे,तेजस शिंदे,राजाराम शिंदे हे आले व गणेश शिंदे यांनी गवारे यांना मारहाण केली

गणेश शिंदे यांच्या तक्रारीनुसार, शिंदे व त्यांचा चुलत भावासमवेत शिक्रापूर येथील सरकारी रुग्णालयात उपचार घेऊन परत येत असताना तळेगाव ढमढेरे येथील गीताई विष्णू मंगल कार्यालय समोर स्कोर्पिओ व बलेनो कार मध्ये थांबलेल्या लोकांनी गणेश शिंदे यांना अडवून शिवीगाळ करत हाणामारी केली. याबाबत गणेश रमेश शिंदे दिलेल्या फिर्यादीवरून दीपक दत्तात्रय गवारी, संभाजी पांडुरंग गवारी दोघे राहणार विठ्ठलवाडी तर अक्षय विक्रम नवले, सागर डुबे दोघे राहणार राहू ता. दौंड अष्टापूर येथील कोतवाल (पूर्ण नाव माहित नाही) यांचे विरुद्ध तर दत्तात्रय नारायण गवारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेश रमेश शिंदे, सागर अरुण शिंदे, अक्षय विजय शिंदे, तेजस राजेश शिंदे व राजाराम काळूराम शिंदे सर्व राहणार भोसे वस्ती विठ्ठलवाडी ता. शिरूर यांचे विरुद्ध हाणामारी, शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून अद्याप कोणासही अटक करण्यात आलेली नाही.

या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदीप भक्त हे करीत आहे.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या