हि शिक्षा अाम्हांला का ?...

पिंपरखेड ,  ता.२४जुलै २०१६ (अाबाजी पोखरकर) : एस.टी.चालकास मारहाण झाल्याच्या कारणावरुन पिंपरखेड ला एस.टी सेवा गेल्या दोन दिवसांपासुन ठप्प अाहे.त्यामुळे नागरिकांचे हाल होत असुन हि शिक्षा अाम्हांला का ? असा सवाल नागरिकांकडुन केला जात  अाहे.

शिरुर अागाराच्या एस.टी.बस चालकास पिंपरखेड-जांबुत रस्त्यावर नुकतीच एका  दुचाकीस्वाराने मारहाण केली होती.त्यानंतर शिरुर-नारायणगाव या गाड्या या मार्गावरुन धावल्या.माञ शुक्रवार व शनिवारी या मार्गावरुन शिरुर अागारावरुन एकहि नारायणगाव एस.टी.बस धावली नाही.तर मारहाणीची घटना हि बुधवार(ता.२०) रोजी घडली होती.

पिंपरखेड येथे येणा-या बस ने प्रवाशांना व शालेय विद्यार्थ्यांना शुक्रवारी सकाळी पंचतळे येथे उतरविले.व प्रवाशांना पिंपरखेड ला बस येणार नाही असे सांगितले.त्यानंतर माञ पिंपरखेड ला एकही बस  न येता पंचतळे वरुन पारगाव मार्गे नारायणगाव ला गेल्या व याच मार्गे पुन्हा अाल्या.

पिंपरखेड ला एस टी च न गेल्याने प्रवाशांना सुमारे पाच किलोमीटर पायपीट करावी लागत अाहे.त्याचप्रमाणे अत्याचाराच्या घटना घडत असताना महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर अाला असताना एकटी महिला, कॉलेजच्या मुली यांनी प्रवास कसा करायचा? या प्रकरणात दुर्दैवी घटना घडली तर याला जबाबदार कोण असा सवाल देखील प्रवाशांकडुन केला जातोय.

दरम्यान बसचालक सचिन औटी यांनी शिरुर पोलीस स्टेशन ला फिर्याद दिली असुन त्या युवकावर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीसांनी दिली अाहे.
याबाबत पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांना विचारले असता अारोपी शोधुन कारवाइ केली जाईल असे त्यांनी सांगितले.

तर शिरुर चे अागारप्रमुख एस.यु.पवार यांच्याशी संपर्क साधला असता चालकास मारहाण केल्याने सर्व चालक एकञ अाले अाहेत.तसेच या बाबत चालकांशी तातडीने चर्चा करुन तोडगा काढण्यात येइल असे बोलताना पवार यांनी सांगितले.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या