उस धारकांचे पेमेंट १५ अॉगस्ट पर्यंत करु...

शिरूर ,  ता.२७ जुलै २०१६ (मुकुंद ढोबळे) : शिरुर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतक-यांचे रखडलेले पेमेंट १५ अॉगस्ट पर्यंत करु अशा अाशयाचे पञ  हिरडगाव (ता.श्रीगोंदा)येथील साईकृपा शुगर अॅड अलाईड इंड. लि. युनिट 2या कारखान्याने प्रशासनाला दिले अाहे.

ऊस गाळपाचे थकित पेमेंट अद्याप न दिल्याने शिरुर तहसिल कार्यालयासमोर शिवसेनेचे योगेश ओव्हाळ,गणेश जामदार यांच्यासह शेतकरी धरणे आंदोलनास गेल्या दोन दिवसांपासुन बसले  बसले अाहे.  

माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या मालकीच्या  साईकृपा शुगर या कारखान्याला शिरुर तालुक्यातील  धानोरे ,वानेवाडी ,वडनेर ,पिंपळसुटी ,मांडवगण फराटा ,मुखई ,मलठन ,धामारी जांबुत ,जातेगाव बु.टाकळीहाजी,डिन्ग्रवाडी ,आंबळे ,उरळगाव ,कवठेयमाई ,दरेकरवाडी,वाघाळे  , गावांतील
शेतक-यांचे ऊस गाळपाचे  पैसे २२ महिणे होऊनही कारखान्याने दिले नाही.वेळोवेळी कारणे सांगुन कारखाना प्रशासनाने शेतक-यांची फसवणुक केली असुन आमचे कष्टाचे पैसेन मिळाल्यास बायका मुलासह पोलीस स्टेशन व तहसीलदार कार्यालय येथे ठिय्या आंदोलन  करणार असल्याचा इशारा ऊस उत्पादक शेतकरी व शिवसेना व इतर संघटनेच्या  वतीने नुकताच देण्यात आला होता.

दरम्यान सायंकाळी उशिरा साईकृपा कारखान्याकडुन प्रशासनाला पञव्यवहार करण्यात अाला.या वेळी तहसिलदार राजेंद्र पोळ,नायब तहसिलदार अशोक पाटील यांनी अादोलकांची भेट घेत या बाबत माहिती दिली.व अांदोलन मागे घेण्याची विनंती केली.
साईकृपा कारखान्याने दिलेल्या पञात कारखान्याने ४९% शेअर्स विकले असुन पैशाची व्यवस्था केलेली असल्याचे म्हटले असुन पेमेंट येण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे नमुद केले अाहे.दि.१५/०८/२०१६ पर्यंत सदरील उस  धारकांचे पेमेंट देणार असल्याचे कारखान्याच्या वतीने पञात कळविण्यात अाले अाहे.

परंतु दिलेल्या या पञावर अांदोलकांनी असामाधान व्यक्त करत कारखान्याचे हे अाम्हांला चौथे पञ असुन कारखाना व्यवस्थापनाने पञव्यवहार न करता  अांदोलनस्थळी भेट घेउन पेमेंट देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली.तसेच जो पर्यंत अाम्हांला न्याय मिळत नाही तो पर्यंत अांदोलन सुरुच ठेवु असे अांदोलकांनी बोलताना  सांगितले.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या