शिक्रापूरात तृप्ती देसाईंची दबंगगिरी; तरुणाला दिला चोप

शिक्रापूर ,  ता.२७ जुलै २०१६ (प्रतिनीधी) : सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी येथील चौकात एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी कि पिडीत युवती गोवा येथील असून शिक्रापूर येथे भाड्याने राहत असुन  रांजणगाव येथील खासगी कंपनीत नोकरी करत आहे. नोकरी करत असताना त्या कंपनीत काम करणाऱ्या एका  युवकाशी तिची ओळख झाली आणि काही दिवसांनी ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले.दरम्यान  श्रीकांत याने लग्नाचे आमिष दाखवत पिडीत मुलीशी शारीरिक संबंध ठेवले आणि शिक्रापूर येथील लॉज तसेच मुलीच्या घरी जात तिचे शी वारंवार शारीरक संबंध ठेवले. त्यानंतर त्या मुलीस गर्भधारणा झाली. यावेळी पिडीत मुलीने लग्न करण्याचे सांगितले असता त्याने जबरदस्तीने शिक्रापूर येथील अष्टविनायक हॉस्पिटल येथे नेत तिच्या इच्छेविरुद्ध गर्भपात केला. यानंतर पिडीत मुलीने त्यास आपण लग्न करू असे सांगितले असता त्याने तिला भेटण्यास टाळाटाळ करत नंतर लग्न करू असे सांगितले. परंतु लग्न करण्याऐवजी त्या मुलीस मी तुला पैसे देतो तू मला नको आहे असे म्हणून भेटण्यास टाळाटाळ करत तू तक्रार देऊ नकोस, मी स्थानिक आहे. तू बाहेरील राज्यातील आहे माझे कोणी काही करू शकत नाही असे म्हणू लागला. यानंतर संबंधित मुलीने शिक्रापूर पोलीस स्टेशन आणि भूमाता ब्रिगेड येथे अर्ज दाखल केला होता. ततर शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आम्ही लवकरच लग्न करणार आहे असे सांगितले होते व  दिलेल्या अर्जाविरुद्ध कसलीही तक्रार नसल्याचे देखील सांगितले होते. परंतु श्रीकांत हा त्या मुलीशी लग्न करण्यास तयार नव्हता. यामुळे पिडीत मुलीने तृप्ती देसाई यांना सांगितले.

यानंतर तृप्ती देसाई यांनी शिक्रापूर येथे येऊन त्या मुलीला आपल्याला पैशाबाबत बोलायचे आहे असे सांगून बोलावले. यावेळी देसाई यांनी भर चौकामध्ये त्या मुलास चोप देत शिक्रापूर पोलीस स्टेशनला नेले. पिडीत मुलीने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असता आरोपीविरुद्ध बलात्कार व गर्भपात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी श्रीकांत अंबादास लोंढे यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे  हे करीत आहेत.

यावेळी बोलत असताना देसाई यांनी सांगीतले कि,  मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेऊन नंतर त्यांना पैसे घ्या म्हणून प्रकरणावर पडदा टाकणे हि बाब निंदनीय आहे, पिडीत मुलगी हि माझ्याकडे आली त्यावेळी मी आता आत्महत्या करणार असल्याचे सांगत होती त्यामुळे एका मुलीचा जीव वाचण्यासाठी त्या आरोपीस चोप देणे गरजेचे असल्यामुळे आम्ही त्यास चोप
दिला आहे. आम्ही त्या आरोपीस चोप दिला असल्याने इतर ठिकाणी अशा बाबींवर आळा बसू शकेल असे यावेळी बोलताना तृप्ती देसाई यांनी सांगीतले आहे.

गर्भपात करणाऱ्या डॉक्टर ची चौकशी करणार – खोपडे
पिडीत मुलीचा गर्भपात जबरदस्तीने तिच्या इच्छेविरुद्ध शिक्रापूर येथील अष्टविनायक हॉस्पिटल येथील डॉ. शरद लांडगे यांनी केला असून त्यांचेकडे
गर्भपात करण्याचा परवाना आहे का डॉक्टर लांडगे यांनी कशाच्या आधारे गर्भपात केला याबाबत देखील चौकशी करणार असून सदर डॉक्टर वर देखील कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी सांगितले.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या