कालवा दुरुस्तीनिधी साठी लवकरच धोरणात्मक निर्णय

शिरूर ,  ता.३०जुलै २०१६ (प्रतिनीधी) : कालव्यांच्या दुरुस्तीसाठी जलसंपदा विभागाकडुन निधी उपलब्ध करुन देण्यासंदर्भात लवकरच धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे जलसंपदामंञी गिरिष महाजन यांनी अाज सभागृहात जाहिर  केले असल्याची माहिती अामदार पाचर्णे यांनी दिली अाहे.
खडकवासला कालव्यातुन पुणे शहरासाठी पिण्यासाठी सोडण्यात येणा-या पाण्यावर नियंञण अाणावे व बेबी कालव्याचे काम तातडीने हाती घ्यावे अशी मागणी लक्षवेधी सुचनेद्वारे अामदार राहुल कुल, अामदार बाबुराव पाचर्णे, संग्राम थोपटे, अामदार महेश लांडगे अादींनी केली.यावेळी झालेल्या चर्चेत अजितदादा पवार यांनी देखील भाग घेतला.

पुणे शहराला माणसी १५० लिटर पाणी देण्याचा मापदंड असताना ३०० लिटर पाणी दिले जाते.खडकवासला प्रकल्पातुन पुणे शहरासाठी साडेसहा टी एम सी पाणी वाटप असताना १६ टी एम सी पाणी दिले जाते.तसेच भामा अासखेड धरणातुन २ टी एमसी पाणी देण्यात येणार अाहे.शेतीसाठी खडकवासला धरणातुन ७८हजार हेक्टर क्षेञाला पाणी अपेक्षित असतानागळती होत असल्या कारणाने ते मिळु शकत नाही.प्रक्रिया करुन बेबी कॅनॉलद्वारे २ टी एमसी पाणी शेतीला देउ शकता येते.माञ मध्यंतरी प्रक्रिया न करताच दुर्गंधीयुक्त पाणी सोडल्याने जलस्ञोत व पिण्याचे पाणी देखील दुषित झाले.

या वेळी लक्षवेधीला उत्तर देताना जलसंपदामंञी गिरीष महाजन यांनी सांगितले कि, पुणे महानगरपालिकेची सर्व प्रकल्प प्रक्रिया तातडीने सुरु करण्याचे अादेश देण्यात येतील.त्याचप्रमाणे राज्यपालांच्या निर्देशानुसार या प्रकल्पांना केवळ २ टक्केच निधीच उपलब्ध होत असल्याने केवळ दिडकोटी रुपयेच निधी मिळतो.

याबाबत  पाचर्णे यांनी या प्रकल्पाला १० टक्के निधी देण्याची मागणी केली असता लवकरच याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असुन पाणीपट्टीतुन उपलब्ध होणारे साडेसातशे ते अाठशे कोटी रुपये निधी दुरुस्ती साठी घेण्यात  यावा याबाबतचे धोरण राज्यपालांच्या संमतीने मंजुर  करण्यात येणार असल्याची माहीती अामदार पाचर्णे यांनी दिली.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या