मागासवर्गीय विदयार्थ्यांच्या कल्याणासाठी प्रयत्नशील-बडोले

शिरूर, ता.३१जुलै २०१६ (प्रतिनीधी) : मागासवर्गीय विदयार्थ्यांच्या कल्याणासाठी सामाजिक विभागाकडुन विशेष प्रयत्न केले जात असल्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी बोलताना सांगितले.

शिरूर येथील गोलेगाव रोडवर शंभर विद्यार्थिनी क्षमतेचे शासकीय वसतीगृहाच्या इमारतीचा पायाभरणी समारंभ कार्यक्रम  सामाजिक न्यायमंत्री  राजकुमार बड़ोले यांचे हस्ते करण्यात आले.या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार बाबूराव पाचर्णे होते .

यावेळी बोलताना बडोले म्हणाले कि, अागामी काळात नोकरी करणा-या महिला यांना देखील वसतिगृह सुविधा  पुरवण्याचा विचार असुन दिव्यांगांना देखील एकाच ठिकाणी लाभ मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील.उच्च शिक्षणात अाय अाय टी सारख्या संस्था उभी करण्यासाठी अागामी काळात विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बाजार समिती सभापती मंगलदास बांदल ,पंचायत समिती सभापती सिध्दार्थ कदम,धर्मेंद्र खांडरे, तालुका प्रभारी दादापाटिल फराटे, शाम चकोर, भगवान शेळके, केशव लोखंडे, माजी आमदार सुर्यकांत पलांडे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण एस आर दाणे, कार्यकारी अभियंता एन ए तेलंग, प्रादेशिक उपआयुक्त एल बी महाजन. नगरसेवक अबिद शेख ,आर पी आयचे तालुका अध्यक्ष नवनाथ कांबळे ,मराठा सेवा संघाचे नामदेव घावटे, मायाताई गायकवाड, कैलास सोनवने, मितेश गादीया,तुषार वेताळ, अादी उपस्थित होते.

यावेळी प्रास्ताविकात प्रादेशिक उपआयुक्त एल बी महाजन म्हणाले कि, मागासवर्गीय मुलींच्या तालुका वसतिगृहातील मुलींना सहाशे रुपये प्रतिमहीना देण्यात येणार असून ,संगणक ,प्रिंटर ,इंटरनेट सुविधा पुरविण्यात येत असून,यातून समाजातील मागास घटकांतील मुलामुलींना चांगले शिक्षण मिळावे हाच मुख्य हेतु असल्याचे त्यानी सांगितले.

तालुका प्रभारी दादा पाटील फराटे यांनी बोलताना सांगितले कि, पारगाव पुलाच्या दुरुस्तीचे काम अामदार पाचर्णे यांच्यामुळे वेळेत पुर्ण होत असुन अंतिम टप्प्यात अाले अाहे.या संबंधी १४ अॉगस्ट ला पुलाचा उद्घाटन समारंभ उरकुन लवकरच पुल वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचे फराटे यांनी बोलताना सांगितले.

जिल्हा परिषद बांधकाम सभापती मंगलदास बांदल  यांनी भाषणाच्या प्रारंभीच फटकेबाजी करत अामदार पाचर्णे यांनी चांगला निर्णय घेतला असुन क्रिडासंकुलासाठी देखील प्रयत्न करावे असे ते म्हणाले.तर माजी अामदार सुर्यकांत पलांडे  यांनी वसतिगृहासंबंधी अडचणी निदर्शनास अाणुन देउन अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न उपस्थित करुन लक्ष घालण्याची मागणी केली.
    
यावेळी बोलताना आमदार बाबुराव पाचर्णे म्हणाले, शिरुर व वाघोली हे एज्युकेशन हब होत असुन ज्याप्रमाणे शिरूर येथे शंभर मुलींच्या शाळेला निधी दिला. त्याप्रमाणे शिरूर येथे मागासवर्गीय शंभर विद्यार्थी वसतिगृह,तर वाघोली येथे २५० विद्यार्थिनी वसतिगृह यासाठी मंजूरी देऊन निधी देण्याची मागणी यावेळी सामाजिक न्यायमंत्री व विशेष सहाय्य विभाग नामदार राजकुमार बड़ोले यांच्याकडे करण्यात आली. तर बडोले यांनी या संबंधी लवकच सकारात्मक निर्णय घेण्यात येइल असे सांगितले.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या