चासकमान चे पाणी वाटप ठरल्याप्रमाणेच-अा.पाचर्णे

शिरूर, ता.१० अॉगस्ट २०१६ (प्रतिनीधी) : कालवा समितीच्या बैठकित ठरल्याप्रमाणेच चासकमान कालव्याचे पाणी वाटप होणार असल्याची माहिती अामदार बाबुराव पाचर्णे यांनी दिली.

खरिप हंगामासाठी खेड व शिरुर तालुक्यासाठी चासकमान कालव्यातुन टेल टु हेड पद्धतीने पाणी सुरु अाहे.सध्या चासकमान धरण शंभर टक्के  भरले असुन सांडवा विसर्ग नदीमध्ये सुरु अाहे. शिरुर  तालु्क्याच्या पुर्व भागात अद्याप समाधानकारक पाउस न झाल्याने टॅंकर सुरु ठेवण्याची स्थिती काही गावांमध्ये कायम अाहे.सध्या लाभक्षेञात पाण्याअभावी जोमात असलेली बाजरी,मका, मुग, अादी पिके जळुन जाण्याची शक्यता  अाहे.त्यामुळे ठिकठिकाणी पाणी मिळविण्यासाठी तीव्र संघर्ष निर्माण होतो अाहे.

या संदर्भात अाज शिरुर येथे सिंचन अावर्तनाबाबत पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांसमवेत बैठक पार पडली.या बैठकित अाजपासुन सुमारे १५ दिवस(ता.२५) पर्यंत कि.मी ९२-१४४ या भागासाठी(रांजणगाव गणपती च्या पुढील भागासाठी) सिंचन कायम राहिल.त्याच प्रमाणे चालु अवर्तन हे टेल टु हेड अशाच पद्धतीने सुरु ठेवण्याच्या सुचना देण्यात अाल्या.कालवा समितीच्या निर्णयानुसार मंजुर  कोठ्यामधुनच शिरुर व खेड उपविभागातील सिंचन अावर्तन पुर्ण करणे अावश्यक अाहे.त्यानंतर धरणातील पाणी साठा व पर्जन्यमान यानुसार पुढील  काळात टेलच्या भागातील काही गावांना पाणी न मिळाल्याने पुढे अावर्तन सुरु ठेवण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे अाग्रही मागणी करण्यात अाली अाहे.

कोंढापुरी तलाव व वेळ नदीवरील सात बंधारे यांमध्ये पाणी सोडण्याची कार्यवाही शिरुर उपविभाकडील सिंचन अावर्तन पुर्ण झाल्यानंतरच केली जाईल.तसेच वेळ नदीवरील बंधा-यांचे ढापे काढण्याचे काम देखील तातडीने होण्यासाठी संबंधित यंञणेला सुचना देण्यात अाल्याची माहिती पाचर्णे यांनी दिली.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या