विद्यार्थीनींनी पाठविल्या जवानांना २ हजार ३०० राख्या

करडे /तळेगाव ढमढेरे ,  ता. १० अॉगस्ट २०१६ (तेजस फडके /प्रा.एन.बी.मुल्ला) : करडे येथील श्री. भैरवनाथ  विदयालयातील ३०० व तळेगाव येथील गुजर प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी २ हजार राख्या सिमेवरील जवानांसाठी पाठविल्या अाहेत .

 करडे येथे प्राचार्य कावरे यांच्या मार्गदर्शनाखाली कलाशिक्षक एस्.पी. शितोळे यांच्या प्रयत्नाने या उपक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी इ.५वी ते इ. १२ वी पर्यंतच्या ३०० विदयार्थीनींनी ३०० राख्या व तेवढीच पोस्टाच्या पत्रावर स्वतः तयार केलेली शुभेच्छापत्रे समारंभपूर्वक सिमेवर पोस्टाव्दारे रवाना करण्यात आली.
यावेळी सरपंच कविताताई जगदाळे यांचे सह पर्यवेक्षक सी.एन. औटी, सुरेखा संतोष शितोळे, मंदा लोखंडे, सुषमा वालझाडे, वर्षा सोनावळे, अरिफा पटेल, सविता बगाटे, तरन्नुम जमादार, रणसिंग रुपाली, वंदना भोसले व बाळासाहेब भालेराव, गणेश ऊईके, संतोष शितोळे यांसह विदयार्थी वर्ग मोठया प्रमाणावर उपस्थित होता.

गुजर प्रशालेच्या वतीने सिमेवरील जवानांना 2 हजार राख्या पाठविल्या

तळेगाव ढमढेरे येथील स्वातंञ्य सैनिक रायकुमार बी.गुजर प्रशालेतील मुलींनी सिमेवर लढून प्राणांची बाजी लावणा-या जवानांसाठी रक्षाबंधनानिमीत्त 2 हजार राख्या पाठविल्या अाहेत.
‘धागा शौर्य का राखी अभिमान की’ या उक्तिनुसार प्रशालेतील मुलींनी स्वयंस्फूर्तीने 2 हजार राख्या जमा केल्या व या राख्या भारतमातेच्या संरक्षणासाठी लढणा-या आपल्या सैनिक बंधूंना पाठविण्यासाठी प्रशालेचे प्राचार्य माणिक सातकर, उपप्राचार्य जगदीश राउतमारे व पर्यवेक्षक राजाराम पुराणे यांच्याकडे सुपुर्द केल्या.

बहीणींच्या या राखीच्या धाग्याने हजारो सैनिकांना आमच्या रक्षणासाठी सिमेवर लढताना प्रेरणा मिळणार असल्याच्या भावना याप्रसंगी बोलताना मुलींनी व्यक्त केल्या.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या