शिंदेवाडीत १५ दिवसात ३ बालकांचा तापाच्या आजाराने मृत्यू

मलठण , ता.१३ अॉगस्ट २०१६ (प्रा.सुभाष शेटे,कवठे यमाई ) : येथील शिंदेवाडीत गेल्या १५ दिवसांत ३ बालकांचा अनाहुत आजाराने मृत्यू झाल्याने खळबळ उडाली अाहे.

मलठणच्या शिंदेवाडीत ताप,उलटी,जुलाबाचे निमित्त झाल्याकारणाने  महिन्यातील २६ जुलैला श्रुती जबाजी तिखोळे या साडे चार वर्षाच्या बालिकेस उपचारासाठी पुण्यात खाजगी रुग्णालयात  दाखल करण्यात अाले होते.परंतु उपचारा दरम्यान दुस-याच दिवशी तिचे निधन झाले.त्यानंतर अनिकेत सुभाष कोळपे या ९ वर्षाच्या बालकास (ता.२) ऑगस्टला पुण्याच्या जहांगीर रुग्णालयात दाखल केले होते. त्याचे ही उपचारा दरम्यान (ता.४) रोजी  निधन झाले. तसेच श्रावणी गुलाब शिंदे या अडीच वर्षे वयाच्या बालिकेस शुक्रवार (ता.१२) रोजी सकाळी  ताप आल्याचे निमित्त होउन मलठण येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात अाले.तिचे हि अशाच प्रकारे सायंकाळी ४ वाजता निधन झाल्याचे ग्रामस्थ व पालकांनी सांगितले. वारंवार झालेल्या या घटनाक्रमात सार्वजनिक आरोग्य विभागाकडून  अद्याप ही या बालकांचा मृत्यू कशाने झाला या बाबत ग्रामस्थाना माहिती प्राप्त होत नसल्याने याबाबत ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
 
अशी हालली यंञणा
चालु महिन्यात१५ दिवसांत शिंदेवाडीत ३ बालकांचा ताप आल्याचे निमित्त होऊन मृत्यू झाल्याने हादरलेल्या सतीश शिंदे,संजय चोरमले,सुभाष कोळपे,हिरामण कोळपे व ग्रामस्थांनी  या घटनांबाबत आमचे कवठे येमाई येथील प्रतिनिधी सुभाष शेटे यांना याबाबत सविस्तर माहिती दिल्यानंतर त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भगवान पवार यांच्याशी आज (ता.१३) रोजी सकाळपासून सातत्याने संपर्क ठेवत शिंदेवाडीतील संशयित रुग्नांना शक्य त्या तातडीच्या आरोग्य सेवा व सुविधा उपलब्ध तातडीने करून देण्याची विनंती केली.त्या नंतर जिल्ह्याचा आरोग्य विभाग सतर्क झाला.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भगवान पवार यांनी तात्काळ तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे व त्यांच्या कर्माचा-यांना योग्य त्या सूचना देत शिंदेवाडीत त्वरेने  योग्य त्या अत्यावश्यक आरोग्य सेवा व सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या.कवठे येमाई प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी  डॉ.नामदेव पानगे,तालुका आरोग्य पर्यवेक्षक जे जी मारणे,आरोग्य सेवक दयानंद माने यांनी ग्रामस्थाना योग्य ते औषोधोपचार व घ्यावयासठी दक्षता या बाबत माहिती दिली.गेल्या १५ दिवसात ३ मुलांचा मृत्यू होऊन अद्याप ही त्या विषयीचा अहवाल अथवा मृत्यूच्या कारणासाठी माहिती न मिळाल्याने ग्रामस्थानी संताप व्यक्त केला आहे.
             
सदरील घटनेचे गांभीर्य व या बाबत आमच्या प्रतिनिधीचा सातत्यपूर्ण पाठपुरावा लक्षात घेत जिल्हा आरोग्य  अधिकारी डॉ.भगवान पवार यांनी तात्काळ दोन तासातच या ठिकाणी तीन शासकीय  एम्बुलन्स व वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून दिले.गेल्या ८ दिवसात शिंदेवाडीत तापाचे १७ संशयित रुग्ण जरी आढळून आले असले तरी आज ही तेथील इतर  अनेक बालकांना त्यांचे पालक तापाच्या भीतीने खाजगी व शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेताना दिसून आले आहेत.

येथील  ताप आलेल्या ७ संशयित बालकांना उपचारासाठी आज दुपारीच उपचारासाठी ससून रुग्णालयात हलविण्यात आले असून यात ४ मुली व ३ लहान मुलांचा समावेश असल्याचे मारणे यांनी सांगितले. तर ४ प्रौढ ताप आलेल्या रुग्नांना शिरूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची  माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली.

शिंदेवाडीत अनाहूत आजाराने मृत्युमुखी पडलेल्या ३ बालकांच्या घटनेने गावात भीतीयुक्त घबराट पसरली असून संबंधित आजार व त्यावर काय नियंत्रण होतेय या बाबत शासकीय आरोग्य यंत्रणेकडून गेल्या १५ दिवसात काहीच माहिती उपलब्ध न झाल्याने  शिंदेवाडीतील ग्रामस्थ व पालक हतबल झाले आहेत.मलठण ग्रामपंचायतीने शिंदेवाडीत स्वच्छते बाबत योग्य त्या उपाय योजना राबविल्या असून ग्रामस्थानी ही आपापल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन उपसरपंच सखाराम मावळे, डॉ.पोकळे, ग्रामपंचायत सदस्य आनंदा गायकवाड, प्रकाश गायकवाड, कैलास कोळपे उत्तम लकडे यांनी केले आहे.Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या