दहिहंडी फोडायला अवतरले कृष्णाचे सवंगडी..!

शिरूर, ता.२७अॉगस्ट २०१६ (सतीश केदारी) : हातात बासरी घेतलेला कृष्ण..रंगीबेरंगी वेश परिधान करुन अालेले कृष्णाचे सवंगडी .. दहिहंडी फोडण्यासाठी लागलेली चढाअोढ..हे दुसरे तिसरे कोणत्या चौकातील दृश्य नसुन ते दृश्य होते अाकांक्षा या विशेष मुलांच्या शाळेतील दहिहंडी चे...! 

शिरुर येथील रामलिंग रोड लगत अाकांक्षा स्पेशल चाईल्ड स्कुल या विशेष मतिमंद मुलांच्या शाळेत अाज दहिहंडी सोहळ्याचे अायोजन करण्यात अाले होते.

या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दहिहंडी चे पुजन करण्यात अाले.त्यानंतर दहिहंडी च्या कार्यक्रमास सुरुवात करण्यात अाली.इतर मुलांप्रमाणे या मुलांमध्ये देखील दहिहंडी फोडण्यासाठी स्पर्धा लागलेली पहावयास मिळत होती.या शाळेत प्रथमच दहिहंडी सोहळा साजरा करण्यात येत असल्याने संस्थेत सकाळपासुनच चैतन्याचे वातावरण निर्मान झाले होते. तर रंगीबेरंगी पेहराव  परिधान करुन  अाल्यामुळे समाजातील इतर मुलांपेक्षा नेहमीच वेगळ्याविश्वात रममाण होत असलेल्या या बहुविकलांग विद्यार्थ्यांच्या चेह-यांवर   वेगळाच अानंद जाणवत होता.

या वेळी संस्थेच्या संस्थापिका  राणीताइ चोरे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी बोलताना सांगितले कि, समाजात विशेष मुलांच्या बाबतीत पालकांच्या मनात अाजही मोठ्या प्रमाणावर अज्ञान असल्याचे दिसुन येते.त्यामुळे गैरसमज होउन पालकांचे 'त्या' मुलांकडे दुर्लक्ष होते.ती समाजासह पालकांना देखील नकोशी होतात.त्यामुळे बहुविकलांग मुले शिक्षणापासुन दुर फेकली जातातच परंतु या मुलांच्या समस्या देखील हळुहळु वाढत जातात.त्या मुळे विशेष व बहुविकलांग विद्यार्थ्यांना किमान शिक्षणाच्या प्रवाहात अाणणे गरजेचे असुन पालकांनी देखील विशेष मुलांकडे लक्ष देणे गरजेचे अाहे.त्यासाठी पालकांची देखील मानसिकता  बदलायला हवी असे मत त्यांनी बोलताना व्यक्त केले.

या दहिहंडी कार्यक्रमासाठी या वेळी संस्थेच्या अध्यक्षा राणीताई चोरे, डॉ.मनिषा चोरे, संस्थेचे मार्गदर्शक दत्ता केदारी,सुरय्या पठाण, सुनंदा मांडले, पुनम घावटे, सायली जंगम, माधुरी गारगटे, पालक व विद्यार्थी अावर्जुन उपस्थित होते.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या