अाता कदापि मागे हटणार नाही..!

शिरूर, ता.२८अॉगस्ट २०१६ (सतीश केदारी) : केंद्र व राज्य शासनाचा खोटारडेपणा उघड करण्यासाठी तळागाळात जाण्याचा प्रयत्न करु प्रसंगी संघर्ष करण्याची वेळ अाली तरी मागे हटणार नाही असा निर्धार शिरुर तालुक्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी बैठकित बोलताना व्यक्त केला.

दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीचे अौचित्य साधुन भाजपा सरकारविरोधात खोटारडेपणा उघड करण्यासाठी 'जनसंघर्ष रॅली' संदर्भात बैठक अायोजित करण्यात अाली होती.

या प्रसंगी शिरुर तालुका कॉंग्रेस अध्यक्ष कौस्तुभ गुजर, शिरुर तालुका युवक कॉंग्रेस चे अध्यक्ष विजेंद्र  गद्रे,  युवक चे तालुका उपाध्यक्ष महेश  जगदाळे,  शिरुर शहराध्यक्ष अमजद  पठाण, अॅड. दिलीप  करंजुले, ज्येष्ठ कार्यकर्ते माणिक ओस्तवाल, माउली काळे, जिल्हा प्रतिनीधी महेश ढमढेरे, बाळासाहेब फडतरे, सणसवाडीचे माजी सरपंच वैभव  यादव, महिला अाघाडी च्या  अध्यक्षा शोभाताई वाघचौरे, अॅड.अांबेकर, नगरसेवक महेंद्र मल्लाव, अादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते  मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

केंद्र व राज्य शासनाला सत्तेत येउन दोन वर्षे झाली परंतु सत्तेत येण्यापुर्वी दिलेल्या घोषणा फसव्या ठरल्या असुन जनतेसाठी कृतीत काहीच येत नसल्याने शेतकरी, कामगार, उद्योजक, व्यापारी, शिक्षक, अादी सर्वच क्षेञात मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली जात असुन सरकारचा खोटारडेपणा उघड करण्यासाठी पुणे जिल्हा कॉंग्रेस कमिटी च्या वतीने पुणे जिल्हयातील संपुर्ण तेरा तालुक्यात,प्रत्येक शहरात 'जनसंघर्ष याञे' ची (ता.२४ ते ३ अॉगस्ट) या कालखंडात अायोजन करण्यात अाले अाहे.

शिरुर तालुक्यात जनसंघर्ष रॅली चे मंगळवारी(ता.३०) रोजी अागमन होत असुन याचा प्रारंभ उरुळी कांचन येथुन होणार अाहे.त्यानंतर वाघोली मार्गे संपुर्ण शिरुर शहरात फिरुन जनजागृती करण्यात येणार असुन कोपरा सभेचे देखील अायोजन केले अाहे.या नंतर न्हावरे फाटा मार्गे करडे,अांबळे, वडगाव रासाई अादी गावांत जाणार अाहे.

या वेळी तळागाळातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार असुन प्रसंगी व्यापक संघर्ष करण्याची वेळ अाली तरी मागे हटणार नाही असा निर्धारच या वेळी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी बोलताना व्यक्त केला.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या