नगरसेवक मल्लाव हत्या प्रकरणी चार अारोपी ताब्यात

शिरूर, ता.३० अॉगस्ट २०१६ (प्रतिनीधी) : नगरसेवक महेंद्र मल्लाव यांच्या हत्येप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण (पुणे) विभागाच्या पथकाने चौघांना अटक केली. यातील मुख्य सूत्रधारांना अद्याप अटक केली नसल्याचे, तसेच त्यांच्या अटकेसाठी शोधपथके तैनात करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्रवीण प्रकाश काळे (वय २३, रा. प्रोफेसर्स कॉलनी, जुना नाका नं. ३, शिरूर), विशाल सुनील काळे (वय २१, ढोरआळी, मुंबईबाजार, शिरूर), सनी संजय यादव (वय १९, रा. कामाठीपुरा, शिरूर) व रूपेश हेमंत लुणीया (वय १९, सोनारआळी, शिरूर) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत.
भरदुपारी बाजारपेठेत मल्लाव यांची हत्या करुन अारोपी फरार झाले होते.त्यांना गुन्हे अन्वेशन विभागाच्या पथकाने अटक केली अाहे.या संदर्भात पोलीस स्टेशनला माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता,पोलिसांकडुन अारोपींसदर्भात माहिती देण्यास टाळाटाळ केली जात होती.

शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
'गरीबांचा नेता' म्हणुन प्रसिद्ध असना-या व  हजारोंना स्वत: रोजगार उपलब्ध करुन देणा-या महेंद्र मल्लाव यांच्या अंत्यसंस्काराला हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.या वेळी मोजक्याच मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पन केली.तर जयश्री पलांडे यांनी बोलताना शिरुर तालुक्यात कायदा व्यवस्थेचे धिंडवडे निघाले असुन पोलीस निरीक्षक गावडे यांची बदली व्हावी अशी मागणी केली.जनसमुदायाने देखील प्रचंड टाळ्या वाजवुन पाठिंबा  व्यक्त केला.

पोलीस स्टेशन ला च  संरक्षण

घटना घडल्यानंतर प्रक्षुब्ध जमावाने रविवारी सायंकाळी जमावाने पोलीस स्टेशन ला लक्ष्य केल्यानंतर पोलीस स्टेशन च्या गाडीसह तोडफोड केली.यानंतर सोमवारी(ता.२९) रोजी पोलीस स्टेशन ला च राज्य राखीव दलासह पोलीस दलाने पोलीस स्टेशन ला अक्षरश: वेढा टाकला होता.त्यामुळे हे संरक्षण पोलीस स्टेशनलाच होते कि काय असा सवाल यावेळी उपस्थितांकडुन होत होता.
त्याचप्रमाणे संपुर्ण शिरुर शहरात एकहि दुकान उघडे नसल्याने बंदोबस्ताला अालेल्या सर्व कमांडो, पोलीस कर्मचारी, महिला कर्मचारी यांचे अक्षरश: हाल झाले. या वेळी फळविक्रेत्यांच्या स्टॉल चा अाधार घ्यावा लागत असल्याचे व पाणी पिण्यासाठी नागरिकांची दारे ठोठावण्याची चिञे ठिकठिकानी प हावयास मिळाली.

ती बैठक अखेरची ठरली...

रविवारी दुपारी क्रुर कृत्य घडण्यापुर्वी अादल्या दिवशी शनिवारी(ता.२७) रोजी दुपारी अडीच ते पाच या दरम्यान  शिरुर तालुका कॉंग्रेस कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक पार पडली.मंगळवारी(ता.३०) रोजी जिल्ह्यातील कॉंग्रेस चे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत जनसंघर्ष रॅली चे शिरुर शहरात अायोजन करण्याचे या बैठिकत  ठरले होते.तसे नियोजन देखील करण्यात अाले होते. या बैठकित तालुक्यातील सर्व कॉंग्रेस चे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांची ओळख व कार्यक्रमाचे नियोजन सांगुन झाल्यानंतर मल्लाव यांनी स्वत:ची ओळख करुन देत जनसंघर्ष रॅली ला येणा-या सर्व कार्यकर्त्यांची जेवणाची व्यवस्था मी करतो असे सांगितले होते.तर बोलताना दु:खाच्या काळात जिल्हाप्रमुख संजय जगताप यांच्यासह तालुक्यातील पदाधिका-यांनी  वेळोवेळी धीर दिला असल्याचे सांगत काहिकाळ ते बोलताना भावनाविवश झाले होते.पुढे बोलताना जनसंघर्ष रॅली संदर्भात अावश्यक ती सर्व मदत करेल,पण जनसंघर्ष याञा यशस्वी करायचीच असे सांगत सर्व कार्यकर्त्यांना जनसंघर्ष याञेसाठी प्रोत्साहन देत होते.

तालुकाध्यक्ष कौस्तुभ गुजर,युवक कॉंग्रेस चे तालुकाध्यक्ष विजेंद्र गद्रे, उपाध्यक्ष महेश जगदाळे, शहराध्यक्ष अमजद पठान,अॅड.दिलीप करंजुले यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असुन शिरुर तालुका कॉंग्रेस ला मोठा धक्का बसला असुन सर्व कार्यकर्त्यांना अाधार देणारा नेता हरपला असल्याच्या भावना पदाधिका-यांनी संकेतस्थळाशी बोलताना व्यक्त केल्या.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या