नगरसेवक महेंद्र मल्लाव हत्याप्रकरणी मुख्य अारोपी अटकेत

शिरूर , ता.२ सप्टेंबर २०१६ (प्रतिनीधी) : शिरूर नगरपालिकेचे  नगरसेवक महेंद्र मल्लाव यांच्या हत्याप्रकरणी प्रमुख दोन आरोपींना गुरुवारी  अटक करण्यात आली असल्याची माहिती शिरूर पोलिसांनी दिली.
 

या हल्ल्यातील मुख्य अारोपी नीलेश ऊर्फ नानू चंद्रकांत कुर्लप व गणेश चंद्रकांत कुर्लप (रा. कामाठीपुरा, शिरूर) या दोघांना अटक करण्यात आली आहे. दि.28 ऑगस्ट रोजी नगरसेवक महेंद्र मल्लाव यांचा राम आळी येथील भर बाजारपेठेत भरदिवसा दुचाकीवरून आलेल्या तरुणांनी धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यानंतर मल्लाव यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर शिरूर शहरात कमालीचे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.अारोपींना तातडीने अटक करा अशी मागणी करण्यात अाली होती.
 
या  हत्येच्या घटनेनंतर पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत पाच आरोपींना अटक केली. त्यात प्रवीण प्रकाश काळे (वय 23), विशाल सुनील काळे (वय 21), सनी संजय यादव (वय 19), हेमंत रूपेश लुनिया (वय 19), अजय काळूराम जाधव (वय 19, सर्व रा. शिरूर) यांना अटक करण्यात आली. त्यांना 9 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली अाहे. तर या घटनेतील फरारी मुख्य आरोपी कुर्लप बंधू यांना गुरुवारी (दि. 1) संध्याकाळी  मिळालेल्या माहितीनुसार शिक्रापूर एमआयडीसी परिसरात सायंकाळी 6 च्या सुमारास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली, असल्याची माहिती शिरुर पोलीसांनी दिली.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या