तहसिल इमारतीलाच खरी 'मदतीची' गरज

शिरूर , ता.२ सप्टेंबर २०१६ (प्रतिनीधी): शिरुर तालुक्याचे महत्त्वाचे शासकिय कार्यालय असलेल्या शिरुर तहसिल कार्यालयाच्या इमारतीची अवस्था अत्यंत दयनिय झाली असुन या कार्यालयालाच खरी मदतीची गरज अाहे.

शिरुर तालुक्याचे महत्त्वाचे शासकिय कार्यालय म्हणुन ओळख असलेल्या शिरुर तहसिल कार्यालय इमारतीस अनन्यसाधारण महत्त्व अाहे.या इमारतीत सर्वसामान्यांशी निगडित ब-याचशा समस्या सोडल्या जातात.

त्याचबरोबर महसुल विभाग,कृषी विभाग,तालुका मॅजिस्ट्रेट,होमगार्ड कार्यालय अादी महत्त्वाची कार्यालये देखील एकाच छताखाली कार्यरत अाहेत.परंतु एक फेरफटका संपुर्ण इमारतीत मारला असता इमारतीची दयनीय अवस्था समोर येते.पाहुया संपुर्ण इमारतीचा घेतलेला अाढावा !

मावा खाउन इथंच थुंकायचं का?

तळमजल्यापासुन वरच्या मजल्याकडे प्रवेश करत असतानाच नागरिकांनी गुटखा,तंबाखु, मावा खाऊन पिंक उडवुन खराब केलेली भिंत प्रथमदर्शनी निदर्शनास येते.या मजल्यावरच नागरिकांना बसण्यासाठी एक बाक समोर तर दुसरे शौचालयाच्या शेजारी तुटलेल्या अवस्थेत पहावयास मिळते.याच मजल्यावरुन दुस-या मजल्यावर जाण्यासाठी अाधार असलेले रेलिंग हे नसल्याचे अाढळते.रेलिंग नसल्याने एकट्या अपंगांनी अाधार घ्यायचा तरी कोणाचा हाच प्रश्न मनात येतो.

तुंबलेली मुतारी प्रतिक्षेत पण कोणाच्या?
दुस-या मजल्यावर प्रवेश केला असता कृषी विभागाचे कार्यालय अाहे.त्याचबरोबर इतर कार्यालये देखिल अाहेत.कृषी विभागाच्या शेजारी व जिन्याशेजारी पुरुषांची मुतारी गेली कित्येक दिवसांपासुन अक्षरश: तुंबलेल्या अवस्थेत असल्याची अाढळते.या मुतारीच्या दरवाज्याला रस्सी चा अाधार ब-याचवेळा दिलेला अाढळतो.इथेही शौचालयांनी नागरिकांनी थुंकुन केलेली अवस्था पहावयास मिळते.

खिडकि अाहे कि प्रवेशव्दार?

तिसरा मजला पाहुन अनेक हास्यास्पद गोष्टी समोर येतात. संपुर्ण तालुक्यातील सातबारे अॉनलाइन करण्यासाठी दिलेले कार्यालय प्रवेश केल्यावर समोर दिसते.या शेजारी मोठ्या थाटात उद्धाटन केलेले होमगार्ड चे समादेश कार्यालय हे नेहमीच कुलुप बंद अवस्थेत असल्याचे अाढळते.शेजारीच तलाठ्यांसाठी मिटिंग हॉल अाहे.अॉनलाइन सातबारे करत असलेल्या कार्यालयाच्या दोन्ही बाजुने दरवाजे बंदच असल्याने अातमध्ये कर्मचारी प्रवेश कोठुन करत असतील असा विचार करत असताना खिडकिच्या समोर एक दगडी विट ठेवली असल्याने व कोणीतरी दगडावर पाय ठेवुन अात प्रवेश केल्यावरच लक्षात येते अरे...इथुन तर अात जा ये करण्यासाठी खिडकिची किती गरज अाहे ते.
याहि मजल्यांवरील मुता-यांची अवस्था पाहिली तर  इतर मुता-यांसारखीच घाणीचे साम्राज्याने डबडबलेली.तर  मुतारी चा व गच्चीचा मुख्य दरवाजा तुटुन पडलेला दिसतो.

संपुर्ण  इमारतीत सगळिकडे कोठेहि फिरा पण धुळ कमी असलेली जागा माञ कोठेहि दिसत नाही.

नागरिक हो तुम्ही देखील लाज बाळगा
जिल्हयात शासकिय कार्यालयांना सुसज्ज जागा नसते.तर काहिंना मुलभुत सुविधांयुक्त प्रशस्त इमारती नसतात.शिरुर तालुक्याला कामकाजासाठी नागरिकांच्याच सोयीसाठी सुसज्ज इमारत मिळाली अाहे.काहि वर्षांपुर्वीचे चिञ पाहिले असता जमिनीवर, मातीत, जागा नसेल तर कोठेहि  बसावे लागत होते. कामे घेउन अाल्यानंतर अक्षरश: उभे राहुन कामे करुन घ्यावे लागत असल्याचे चिञ पहावयास मिळायचे.परंतु अाता नवीन इमारतीत किमान सर्वांना बाकांवर  बसायला तरी मिळते. कार्यालये देखिल एकाच छताखाली असल्याने जास्त होणारी धावपळ थांबली अाहे.  शासकिय इमारत शासनाची अाहे म्हणुन दिसेल तिथे थुंकायचे,इमारतीची मोडतोड करायची,भिंती घान करायच्या  हे प्रकार नागरिकांनीचं कुठंतरी थांबवायला हवेत.या इमारती अापल्यासाठीच अाहेत.याचे भान प्रत्येक नागरिकाने ठेवायले हवे. तसेच यासाठी  प्रशासनाने देखिल प्रामुख्याने लक्ष घालुन  भिंती रंगवणा-या,अस्वच्छता करणा-या बहाद्दरांवर देखिल कडक निर्बंध घालणे गरजेचे अाहे.

या पुर्वी यशस्विनीच्या महिलांनी स्वच्छतेसाठी अांदोलन देखिल केले होते. परंतु शासकिय निधीच उपलब्ध नसल्याने स्वच्छता करता येत नसल्याचे यशस्विनीच्या महिलांना त्या वेळी सांगण्यात अाले होते.

भव्य व सुसज्ज इमारत असुन देखिल शासकिय इमारतीला स्वच्छतेसाठी निधी जर शासनाकडुन उपलब्ध होत  नसेल तर स्वच्छता होणार कशी?,देखणी इमारत असुन उपयोग काय? या साठी देखिल नागरिकांनी वर्गणी गोळा करावी का ? असे सवाल थेट नागरिकांकडुनच केले जात अाहेत.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या