शिक्रापुरात शाळकरी मुलीचे अपहरण करून बलात्कार

शिक्रापूर,  ता. ४ सप्टेंबर २०१६ (प्रतिनीधी) : शिक्रापुर नजीक असलेल्या एका गावात  दहावीत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीचे शिक्रापूर येथील दोन महिलांनी अपहरण करून एका युवकाने तिच्यावर अत्याचार  करण्याचा प्रकार घडला असून बलात्कार करणाऱ्या नराधमास व त्यास मदत करणाऱ्या दोन्ही महिलांना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे.

 याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,  शिक्रापूर जवळील एका गावात दहावीत शिक्षण घेणारी मुलगी हि दुपारच्या सुमारास शाळेतून बाहेर आली असता अश्विनी नाना दहिफळे व अर्चना तुळशीदास दहिफळे या दोन महिलांनी त्या युवतीस आम्ही बकरू खरेदी करण्यासाठी तुझ्या वडिलांना काही पैसे दिले आहे,परंतु आम्हाला तुमचे घर माहिती नाही. तू आमच्या सोबत चल असे सांगून  फूस लाऊन तिला वाहनात बसवून शिक्रापूर येथे आणले.

त्यानंतर शिक्रापूर येथून नाष्टा करून पुढे जात असताना या दोन्ही महिलांनी एका युवकास देखील सोबत घेतले.या महिलांच्या सोबतीला हा युवक असताना त्यांनी अहमदनगर च्या दिशेने गाडी नेली यावेळी या दिशेने जात असताना संबंधित पिडीत युवतीने आरडाओरडा केला त्यामुळे या सर्वांनी त्या युवतीचे तोंड दाबून पुढे प्रवास सुरु ठेवला यावेळी त्या गाडी चालकाने काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आल्यामुळे या सर्वांना मध्येच सोडून दिले.

यानंतर सर्वजण भाड्याने दुसरी गाडी करून तिला मोहटादेवी येथे घेऊन गेले. परंतु मोहटादेवी येथे गेले असताना मुलगी तेथील सुरक्षारक्षकासमोर रडू लागली त्यावेळी तेथील सुरक्षारक्षकाला घडलेला सर्व प्रकार कथन केला.सुरक्षारक्षकाने  प्रसंगाचे गांभिर्य लक्षात घेत मुलीचे अपहरण करणाऱ्या त्या दोन महिला व युवक यांना तेथील पाथर्डी पोलिसांना बोलावून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांनतर पाथर्डी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पिडीत युवतीची चौकशी करून घडलेला प्रकार शिक्रापूर पोलिसांना कळविला व शिक्रापूर पोलिसांकडे तपास वर्ग करण्यात आला.

शिक्रापूर पोलिसांनी चौकशीअंती व पिडीत युवतीची वैद्यकीय तपासणी केली असता तिचेवर लैंगिक अत्याचार झाल्याचेही  निष्पन्न झाले. यानंतर पिडीत युवतीने तुषार सखाराम बरकटे याने बलात्कार केला असल्याचे सांगितले.

 यामुळे तुषार सखाराम बरकडे (रा. करंदी) तसेच अश्विनी नाना दहिफळे, अर्चना तुळशीदास दहिफळे दोघी (रा. शिक्रापूर)  यांचे विरुद्ध बाललैंगिक अत्याचार, बलात्कार आणि अपहरण केले प्रकरणी बलात्कार, अपहरण व तसेच बाललैंगिक अत्याचार कलम ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे.

सर्व आरोपींना पुणे येथील सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ९ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वारुळे हे करत आहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या