'मुक्तद्वार दर्शन' ला भाविकांचे प्रचंड हाल

रांजणगाव गणपती, ता.५ सप्टेंबर २०१६ (सतीश केदारी) : महागणपतीच्या मुक्तद्वार दर्शनासाठी लाखो भाविकांनी एकाच वेळी प्रचंड गर्दी केल्याने व प्रशासनाच्या नियोजनशुन्यतेने भाविकांचे प्रचंड हाल झाले. या वेळी देवस्थान विरोधात अनेकांनी रोष व्यक्त केला.

रांजणगाव गणपती येथे गेल्या दोन दिवसांपासुन मुक्तद्वार दर्शन सुरु अाहे.त्यानिमित्ताने भाविकांना थेट गाभा-यात जाउन महागणपतीच्या पविञ मुर्तीचे हात लावुन दर्शन घ्यायची संधी उपलब्ध झाली अाहे.वर्षातुन केवळ भाद्रपद महिन्यातच ही पर्वणी येते.पहाटे तीनपासुनच भाविक गाभा-यात जाउन मुक्तद्वार दर्शनासाठी येत असतात.

रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने लाखो भाविकांनी रांजणगाव येथील महागणपती च्या दर्शनासाठी गर्दी केली होती.वेळी दर्शनबारी ला एकाच वेळी गर्दी मोठ्या प्रमाणावर झाल्याने पोलीसांनी देखिल मोठा बंदोबस्त ठेवला होता.पोलीस निरीक्षक इंदलकर हे सकाळ पासुन कर्मचा-यांसह गर्दीवर नियंञण ठेवण्याचा प्रयत्न करत होते.परंतु गर्दी मोठ्या प्रमाणावर झाल्याने गर्दी ला अावरता अावरता पोलीसांच्या अक्षरश: नाकिनऊ येत होते.अपंग,वयोवृद्ध यांचे देखिल दर्शनबारीत उभे राहुन दर्शन घेताना प्रचंड हाल होत होते.तर गाभा-यात महिला कर्मचारी अक्षरश: दर्शनासाठी गाभा-यात अालेल्या भाविकांना ओढुन पुढे ढकलत होती.

मुलभुत सुविधा कुठयं?
तीन तास रांगेत उभे राहुन दर्शन घेउन अालेल्या भाविकांना वैद्यकिय सुविधा दर्शनी भागात करायची गरज असताना एका कोप-यात केली गेली असल्याने वैद्यकिय सुविधा केवळ देखाव्यापुरतीच उभी असलेले चिञ जाणवत होते.त्याचबरोबर पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था असलेल्या ठिकाणी देवस्थान ने थाटात मंडप थाटल्याने भाविकांनी पाणी प्यायचे कोठे? हा सवाल उपस्थित भाविकांना पडत होता.

पासची खिरापत
देवस्थान तर्फे गावकरी यांना दिला जाणारा पास सुमारे ७००० ते ८००० च्या अासपास वाटप केल्याची माहिती देवस्थान चे अध्यक्ष प्रा. नारायण पाचुंदकर यांनी दिली. वाटप केलेले मोठ्या प्रमाणावर पासेस या मुळे देखिल  अाश्चर्य व्यक्त केले जाते.

अॅम्ब्युलन्स कडे दुर्लक्ष
दोन दिवसांपुर्वी दर्शनसाठी अालेल्या एका  भाविकाचा मृत्यु झालेला होता.त्याची दखल घेत देवस्थान ने अॅम्ब्युलन्स सुसज्ज ठेवणे गरजेचे असताना मागील प्रवेशद्वाराजवळील दोन्हीही अॅम्ब्युलन्स वाहनांच्या मध्ये अडकलेल्या स्थितीत होत्या.तर या प्रवेशद्वाराची चावी देखिल तातडीने उपलब्ध होत नसल्याने अापत्कालीन प्रसंग उद्भभवल्यास तातडीने या सुविधा कितपत उपलब्ध होउ शकल्या असत्या? हा देखिल सवाल मनात येतो.

रविवार सुट्टी चा दिवस व एकाच वेळी भाविकांची प्रचंड गर्दी या मुळे वाहनतळ फुल्ल झाल्याने रस्त्याच्या दुतर्फा लांबच लांब रांगा  लागल्या होत्या.अालेल्या भाविक व पर्यटकांनी देवस्थान विरोधात प्रचंड रोष व्यक्त केला. 

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या