अपघातग्रस्त विद्यार्थ्याचा देवस्थानला विसरच..!

रांजणगाव गणपती, ता.८सप्टेंबर २०१६ (सतीश केदारी) : मुक्तद्वार दर्शनासाठी येताना अपघातात जखमी पाय निकामी झालेल्या विद्यार्थ्याला घटनेला वर्ष उलटुनही देवस्थान ने मदत दिलेली नसल्याची माहिती उघड झाली अाहे.

भाद्रपद महिन्यात पाच दिवस भाविकांना रांजणगाव गणपती येथील महागणपतीचे गाभा-यात जाउन मुक्तद्वार दर्शन घेण्याची पुर्वापार परंपरा अाहे.परिसरातील भाविक हे श्रद्धेने पाच दिवस अनवानी चालत येत द्वारयाञा करत असतात.या द्वारयाञेसाठी पहाटे तीन पासुन महागणपती मंदिरात दर्शनबारी साठी प्रतिवर्षी मोठी गर्दी होत  असते.
 
गतवर्षी याच महिन्यात रांजणगाव गणपती येथील महागणपतीचे मुक्तद्वार दर्शन घेऊन पायी चालत जाणाऱ्या कोंढापुरी येथील विद्यार्थ्यांना पुणे-नगर महामार्गाने जाणा-या भरधाव खासगी बसने उडविले होते. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता.तर तिघे जण गंभीर जखमी जखमी झाले आहेत.या झालेल्या अपघातात वैभव अशोक कारकडू (रा. कोंढापुरी) याचा एक पाय गुडघ्यापासून कापावा लागला तर दुसरा पाय पुर्णपणे निकामी झाला अाहे. प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारासाठी साधारणतः आठ लाख रुपये एवढ्या मोठ्या रकमेची आवश्‍यकता असताना घरी अठराविश्वे दारिद्य्र असल्याने ही रक्कम गोळा कशी करायची? हा प्रश्न कुटुंबियांसमोर उभा राहिला होता. परंतु कोंढापुरी येथील माजी सरपंच स्वप्नील गायकवाड यांच्यासह गावकऱ्यांनी दिलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जमा झालेली रक्कम उपचारासाठी दिली.

अशोक कारकूड यांची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक असल्याने विविध ठिकाणांहून ते मदत मिळविण्याचा प्रयत्न करत होते. रांजणगाव देवस्थान ट्रस्टकडे त्यांनी आर्थिक मदत मागिती होती. परंतु, देवस्थानने अतिशय धक्कादायक उत्तरे देऊन मदत टाळली. दरम्यान, शिरूर तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी अक्षरशः खाऊचे पैसे वैभवच्या उपचारासाठी दिले. 'सकाळ' व 'ई-सकाळ'वर बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला होता. चिमुकल्यांसह जगभरातील नागरिकांनी  विविधप्रकारे मदत देऊ केली. परंतु, कोंढापुरीपासून काही कि.मी. अंतरावर महागणपतीच्याच दर्शनासाठी आलेल्या विद्यार्थ्यांला मदत नाकारण्यात आली.

देशासह राज्यातील विविध ट्रस्ट अपघातग्रस्तांच्या उपचारासाठी मदत करत असल्याच्या विविध बातम्या प्रसिद्ध होत असताना रांजणगाव देवस्थान ने मदत नाकारली होती.परंतु जगभरातून नागरिकांनी अपघातग्रस्त विद्यार्थ्याला मदत देउ केली.

रांजणगाव देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष नारायण पाचुंदकर यांची थेट भेट घेतली असता वर्षहोउन अापण मदत केली अाहे का  हे विचारले असता त्यांनी सांगितले कि, अामच्या मदतीच्या निकषांमध्ये ते बसत नसल्याने व त्या वेळी देवस्थान ची परिस्थिती चांगली नसल्याने त्यांना मदत नाकारली असल्याचे त्यांनी उत्तर दिले.

दरम्यान,अपघातग्रस्त वैभव कारकुड यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधला असता, देवस्थान कडे मदतीसाठी अर्ज करुन याचना करण्यात अाली होती.परंतु देवस्थान ने मदत नाकारली. घटनेला वर्ष उलटले अाहे. पायाची सुज कमी झाली असुन वेळोवेळी नागरिकांनी मदत देउ केल्याने वेळोवेळी विविध प्रकारच्या तीन ते चार शस्ञक्रिया करण्यात अाल्या चे शक्य झाले झाले. वैभव ला अद्याप चालता  येत नसले तरी त्यासाठी व्हिलचेअरद्वारे प्रयत्न करत असल्याचे व उपचारांसाठी अद्यापही मदतीची गरज असल्याचे कारकुड यांनी सांगितले. . (क्रमश:)

संबंधित बातम्या :


Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या