मायलेकरांच्या अपघाती मृत्युने परिसरात हळहळ

मांडवगण फराटा , ता.१०सप्टेंबर २०१६ (प्रतिनीधी) :  मांडवगण फराटा ते तांदळी या रस्त्यावर कंटेनरच्या चाकाखाली अपघात होउन माय लेकरे जागीच ठार झाल्याची  दुर्दैवी घटना घडली अाहे.

शुक्रवार(ता.९) राञी च्या सुमारास माळवाडी येथे हि दुर्दैवी घडली. या अपघातामध्ये सुनिता संतोष राजगुरू (वय-35), कॄष्णा संतोष राजगुरू (वय- 17) हे दोघे कंटेनरच्या चाकाखाली सापडल्यामुळे त्यांचा जागीच मॄत्यू झाला.

पोलीसांनी दिलेली माहितीनुसार, सुनिता राजगुरू व कॄष्णा राजगुरू हे दोघे माय-लेकरे (एम एच 12 जी एम 6430)या दुचाकीवरून तांदळीकडून गारमाळाकडे त्यांच्या घरी परतत होते. त्यांच्या पुढे कंटेनर (एम एच 06 ए सी 6428) चालला होता. या वेळी हे दोन्ही माय-लेकरे कंटेनरच्या चाकाखाली सापडून त्यांचा जागीच मॄत्यू झाला.

या घडलेल्या अपघाताबाबत मात्र  माहिती मिळु शकली नाही. दुचाकीच्या पाठीमागे येत असलेला (पिकअप एम एच 16 ए वाय 61) हा व कंटेनर देखील पोलीसांनी ताब्यात घेतला आहे.

अपघातानंतर कंटेनर चालक या घटनेनंतर मात्र पसार झाला आहे.
मांडवगण फराटा या गावातील आठ दिवसामध्ये वेगवेगळया ठिकाणी चौघांचा अपघाती मॄत्यू झाला आहे. त्यामुळे मांडवगण फराटा परीसरात ग्रामस्थांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

या अपघाताचा पुढील तपास शिरूरचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस उपनिरीक्षक एस एस वाघमोडे पोलीस हवालदार श्रावण गुपचे,  पोलीस हवालदार आबासो जगदाळे, योगेश गोलांडे, विक्रम जमादार, नितीन घोडके, रमेश आडागळे  हे करत आहेत.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या