पुढा-यांनो हीच तुमची रित का?

शिरूर, ता.१२सप्टेंबर २०१६ (सतीश केदारी) : ज्याने लेखनीद्वारे अनेक पुढा-यांना ओळख दिली 'त्या' पञकाराच्या दुर्दैवी अपघाती मृत्युनंतर शेवटच्या निरोपाला देखील तालुक्यातील सर्वच संवेदनाहीन अाजी माजी पुढा-यांनी पाठ फिरवण्याची दुर्दैवी घटना घडली.

सविस्तर हकिकत अशी कि,मुळचे श्रीगोंदा तालुक्यातील रहिवाशी असणारे व शिक्षकी पेशा निमित्त मांडवगण फराटा येथे तात्पुरते स्थायिक झालेले मांडवगण फराटा येथील एका बड्या वृत्तपञाचे पञकार सुखदेव मोटे यांचे दहा दिवसांपुर्वी पुणे-सोलापुर महामार्गावर झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यु झाला अाहे. या अपघाती मृत्युनंतर तालुकाभर तीव्र दु:ख व्यक्त करण्यात अाले.अपघाती मृत्युनंतर  अंत्यंविधीला मांडवगण फराटा येथील ग्रामस्थ व काहि अपवाद वगळता तालुक्यात एकाही पुढा-याने उपस्थिती दर्शविली नाही.त्याचप्रमाणे तालुक्यातील एका माजी नेत्याचे दशक्रिया चे कारण सांगुन शिरुर तालुक्यातील एका हि नेत्याने अपघातात दुर्दैवी मृत्यु झालेल्या पञकाराच्या दशक्रिया विधी ला अक्षरश: पाठ फिरविली.साधी येण्याची तसदी सुद्धा घेतली नाही.

पञकार सुखदेव मोठे हे गेल्या सातवर्षांपासुन पञकारितेत कार्यरत होते.शिक्षकी पेशा सांभाळुन त्यांनी पञकारितेच्या माध्यमातुन समाजसेवा केली.पञकारितेच्या काळात लेखनीच्या माध्यमातुन मोटे यांनी अनेकांना मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी दिली.

पञकारिता म्हटली कि जाहिरात देणे-घेणे अालेच.पञकारितेत काम करताना या जाहिराती देखील उधार स्वरुपात घेतल्या जातात.नंतर पुढा-यांकडुन त्या पञकाराला जाहिराती चे पैसे मिळत असतात.काहि वेळा मोठ्या थाटात जाहिरात दिली जाते व पैसे माञ सवड मिळेल तेव्हा त्या पञकाराला दिले जातात. पुढे याच जाहिराती च्या जोरावर संबंधित पुढारी वर्षभर मोठा थाट करत असतो. बातमीत चुकुन नाव राहिले तर नाव का दिलं नाही, बातमी छोटी का दिली? अशीच बातमी का  दिली नाही? जाहिरात देउन हि माझ्या विरोधात का  छापली ? असे म्हणत नाना प्रश्न करुन संबंधित पञकाराला गुलाम कसं करता  येइल याचाच अधिक विचार पुढारी करत असतो.मोटे हे देखिल यासाठी अपवाद ठरले नाहित.प्रा.मोटे यांनी दिलेल्या जाहिरातीचे पैसे देखिल स्व: खर्चाने  भरले अाहेत.भरायचे बाकि अाहेत.

प्रत्येक वेळी बातमी देण्यासाठी पहिला फोन करणारे,बातमी न अाल्यावर देखिल न चुकता फोन करणारे स्वार्थी पुढारी दु:खात सांत्वन करायला नेमके गेले कोठे? शेवटचा निरोप द्यायला देखिल यायची तसदी घेउ नये? इतर वेळी जीव ओवाळायला तयार असणा-या पुढा-यांनो हाच पञकारांकरवी असणारा तुमचा कळवळा का?

नुकत्याच झालेल्या त्या पञकाराच्या दशक्रिया विधी ला त्यांच्या मुळ गावातील व त्यांच्या तालुक्यातील असंख्य लोकप्रतिनीधींनी हजेरी लावली.यावेळी उपस्थित शिक्षणक्षेञासह सर्वच पञकारांच्या वतीने भावसुमनांजली वाहुन मोठे दु:ख व्यक्त केले गेले.यावेळी त्या तालुक्यात शिरुर तालुक्यातील पुढा-यांविषयी मोठा संताप व्यक्त केला गेला.

ज्यांनी लेखनीद्वारे तुम्हांला राज्यभर प्रसिद्धी दिली त्यांच्या शेवटच्या क्षणाला देखिल निरोप द्यायला उपस्थित राहता येत नसेल,पञकारांचा फक्त कढिपत्याप्रमाणे उपयोग करायचा असेल?पञकारांकरवी हिच संवेदनशीलता असेल तर पुढा-यांनो असं वागणं बरं नव्हं !

घडलेल्या घटनेचे पञकारांनी व समाजाने देखिल अाता विचार करण्याची वेळ अाली अाहे.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या