अॉफिस कॉर्पोरेट.. भाविकांच्या सुविधांना माञ ठेंगा

रांजणगाव गणपती, ता.१३सप्टेंबर २०१६ (सतीश केदारी) : येथील देवस्थान ने स्वत:च्या सोयीसाठी नुकतेच अॉफिस कॉर्पोरेट थाटले माञ भाविकांच्या सोयी-सुविधांकडे रितसर डोळेझाक केली अाहे.

अष्टविनायकांपैकी एक महत्त्वाच्या  असणा-या तिर्थक्षेञांपैकी रांजणगाव गणपती येथील महागणपती दर्शनासाठी राज्यभरातुन भाविक दर्शनासाठी येत असतात.पुणे-नगर महामार्गावरच रांजणगाव चे महागणपती तिर्थक्षेञ लागुन असल्याने पर्यटकांची सतत वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते.त्यामुळे भाविकांची देणगी देखिल त्याप्रमाणे जमा होत असते.देवस्थान ने नुकत्याच झालेल्या द्वारयाञेत मोठा खर्च करुन बांधलेल्या कार्यालयाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन केले.

द्वारयाञेत लाखो भाविकांनी गर्दी केलेली होती.या मध्ये अाबालवृद्धांसह अपंग,बालक यांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले.या कडे देवस्थान ने माञ साफ दुर्लक्ष केले.दर्शनमंडपात ज्या सुविधा उपलब्ध करणे गरजेच्या होत्या त्याचा देवस्थान ला अक्षरश: विसर पडला होता. दर्शन घेन्यासाठी अाल्या नंतर लाखो रुपये खर्चुन बांधण्यात अालेल्या सुलभ शौचालयांचा वापर माञ माञ शुन्य झाला कारण तशी व्यवस्था देवस्थानकडुन करण्यात अालीच नव्हती.तर एका  मिळालेल्या माहितीनुसार एका भाविकाने पंख्ये भेट म्हणुन दिले अाहेत.ते किमान याञाकाळात बसवणे गरजेचे असताना ते  अद्याप तसेच धुळखात पडलेले अाहेत.

लाखो भाविकांची गैरसोय होत असताना देवस्थान माञ स्वत:च्या सोयीसाठी कॉर्पोरेट अॉफिस थाटते याचीच येणा-या जाणा-या भाविकांमध्ये चर्चा होउ लागली अाहे.Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या