चार वर्षाचा अचाट बुद्धी लाभलेला 'यश'

शिक्रापूर ,  ता.१४सप्टेंबर २०१६ (शेरखान शेख) : येथील करंजे नगर येथील  साडेचार वर्षाचा चिमुरडा  शाळेत न जाता कोणालाही लाजवेल अशा कोणत्याही प्रश्नाची उत्तरे काही क्षणातच देत असून तो संपूर्ण शिरूर तालुक्यातील गुणवंत मुलांमधील अल्प वयातील अचाट बुद्धी लाभलेला मुलगा असल्याचे बोलले जात आहे.

सविस्तर असे कि, शिक्रापूर येथे राहत असलेल्या दौंडकर कुटुंबातील यश हा वयाच्या दुसऱ्या वर्षापासूनच परिसरातील अनेक मुलांची नावे अचूक सांगत असल्याचे पाहून बी. ए. पर्यंत शिक्षण झालेल्या यशच्या आई छाया यांनी त्याला विविध प्रकारचे घरगुती शिक्षण देण्यास सुरवात केली. त्यानंतर हा बौद्धिक क्षमतेचा यश हा सांगितलेले सर्व काहीक्षणातच लक्षात ठेवू लागला. यश हा अजिंक्यतारा इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये नर्सरी वर्गात शिकत अाहे

लहान मुलांच्या सोबत खेळ खेळण्याच्या वयात यश ला लिहिता वाचता देखील येत नाही  असे असून देखिल यश काही क्षणात जगातील सर्व देशांच्या राजधान्या, सूर्यमालेतील ग्रह, राज्यांच्या राजधान्या, भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यांचे मुख्यमंत्री, विविध चारचाकी गाड्यांची नावे, आई वडिलांचे मोबाईल नंबर तसेच इतर काही प्रश्नाची उत्तरे देखील तो विचारताच काही सेकंदात सांगत आहे. सध्या यश हा जगातील सर्व देशांची नावे व राजधान्या फक्त दहा मिनटात सांगत आहे. तर भारतातील राज्य व त्यांच्या राजधान्य आठच मिनटात सांगत आहे. यामुळे यश च्या या अचाट बुद्धीमत्ते चे  तालुक्यातून कौतुक होत अाहेत.

तर यश हा अनेकांचे आकर्षण ठरत आहे. तर अनेक ठिकाणच्या कार्यक्रमांमध्ये त्याला आवर्जून बोलाविले जात आहे. यश मधील असलेले सर्व गुण पाहून नुकतेच त्याला खोपा या नवीन येत असलेल्या मराठी फिल्म मध्ये कलाकार म्हणून घेतले आहे, सध्या यश कराटे प्रशिक्षण घेत असून त्या ठिकाणी सुद्धा तो कमी नाही. यश ला येत असलेल्या ज्ञानाबाबत विचारले असता मला हे सर्व माझ्या अाइने शिकविले असल्याचे सांगत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या