अावाहन..धास्ती..अन जागी तरुणाई

शिरूर, ता.१४ सप्टेंबर २०१६ (सतीश केदारी): शिरुर तालुक्यात चोरांच्या बाबत पोलीसांकडुनच सावधानतेचे अावाहन केल्यानंतर नागरिकांमध्ये काहिशी घबराट निर्माण झाल्याने ठिकठिकाणी तरुणाई राञभर जागी असल्याचे काल(ता.१३) अनुभवयास मिळाले.

सविस्तर माहिती अशी कि, काल (ता.१३) रोजी राञी शिरुर, शिक्रापुर व रांजणगाव पोलीसांकडुन चोरटयांपासुन सावधानतेचा इशाराबाबत माहिती पोलिसांनी सोशल मीडियावर दिली.यावेळी दक्षतेचे अावाहन करत अफवा परवु नये असे देखिल सुचित करण्यात अाले.पोलीसांनीच थेट माहिती दिल्याने नागरिकांध्ये काहि काळ भीतीचे वातावरण पसरले होते.

सोशल मिडिया वर अालेल्या मेसेज मुळे ठिकठिकाणी तरुणाइ ने पोलीसांच्या संदेशाचे पालन करत अनेकांना जागे राहण्याचे अावाहन केले.त्याचप्रमाणे गणेशोत्सव सुरु असल्याने ठिकठिकाणी वाड्या वस्त्यांवर  देखिल अनेक तरुणांनी जाउन नागरिकांना सतर्क राहण्याचे अावाहन केले.

त्याचप्रमाणे विविध गावात ग्रामस्थ, ग्राम सुरक्षा दल, पोलिस मित्र यांची बैठक घेऊन पोलिसांनी देखिल नागरिकांना  त्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला.

सोशल मिडियावर देखिल तरुणाइ ने संयम राखत अनेक भागात जागृती केल्याने पोलीसांच्या अावाहनानंतर धास्तावलेल्या नागरिकांना राञभर जागे राहत तरुणाइ ने काल खडा पहारा दिला.त्यामुळे ब-याचशा भागात सावधानतेचा इशारा दिल्यानंतर नागरिक निश्चिंत परंतु जागरुक झाले होते.

दरम्यान, परिसरातील विविध गावांत छोट्या-मोठ्या चोरीच्या घटना घडत आहेत. पोलीसांनी देखिल राञभर गस्त देणे सुरु केले अाहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या