मुंबई च्या प्रसिद्ध लावणी कलाकाराचा दुर्दैवी मृत्यू

शिक्रापूर ,  ता.१७ सप्टेंबर २०१६ (शेरखान शेख) : दिलखेचक अदांनी रसिकांना घायाळ करणा-या मुंबई च्या प्रसिद्ध लावणी कलाकाराचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली अाहे.


रूपछाया दत्ताजी शिंदे (वय –२९ रा. ३०२ जयगणेश पार्क, डोंबिवली, मुंबई) असे मृत्यु झालेल्या कलाकाराचे नाव अाहे.

सविस्तर माहिती अशी कि,पाबळ  येथे बुधवारी रात्री गणेशोत्सवानिमित्त लावणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमासाठी पुणे बालगंधर्व रंगमंदिर येथील कलाकारांचा संच  त्यांच्या एम एच ०४ जि २२७१ या लक्झरी बसने कार्यक्रमासाठी आले होते. परंतु बुधवारी अचानक पावसाने हजेरी लावल्यामुळे त्यांचा कार्यक्रम रद्द झाला. कार्यक्रम रद्द झाल्यामुळे सर्व कलाकार पुन्हा चालले होते.


यावेळी अंधारामुळे रस्ता चुकल्यामुळे बस चालक संतोष कदम याने बस पाबळ-केंदूर रोडवर थांबवून दुसऱ्या मोटारसायकल चालकास रस्ता विचारत होता. यावेळी बसमधील काही महिला लघुशंकेसाठी खाली उतरल्या व बसच्या मागील बाजूस बसल्या परंतु बस चालक कदम यास महिला खाली उतरल्या असल्याचे माहित नव्हते व रस्ता चुकल्यामुळे बस चालूमध्ये रिवस मागे घेतली. यावेळी खाली उतरलेल्या महिलांपैकी सिमरन मोहापात्रा, सुरेखा दरेकर, दर्शना तेजुरे, रुपछाया शिंदे या त्या बसच्या खाली सापडल्या गेल्या व त्यांनी आरडाओरडा केला यावेळी बस चालक व इतरांनी खाली उतरून पहिले तर बसच्या मागील चाकाखाली रुपछाया शिंदे हि कलाकार चिरडल्या गेली आणि तिच्या डोक्यावर बसचे चाक चढले व तिचे डोके फुटून मेंदू बाहेर पडला.

या झालेल्या अपघातामध्ये रुपछाया हिचा जागीच मृत्यू झाला. याबाबत नवनाथ तानाजी भोसले यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून शिक्रापूर पोलिसांनी लक्झरी बस व बसचा चालक संतोष राम कदम यास ताब्यात घेतले असून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जयप्रकाश चव्हाण हे करत आहे.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या