जागा झालाय महाराष्ट्र..पेटुन उठलाय महाराष्ट्र

शिरूर, ता.१९ सप्टेंबर २०१६ (सतीश केदारी) : मराठा क्रांती मोर्चा ची दिवसेंदिवस ठिकठिकाणी धग वाढत असुन प्रचंड प्रतिसाद मिळतो अाहे.गावोगावी बैठका घडत असुन संपुर्ण महाराष्ट्रभर मराठा समाज क्रांती ची मशाल घेउन रान पेटवु लागला अाहे.या मध्ये सोशल मिडिया ची भुमिक अत्यंत मोलाची ठरताना दिसते

स्मार्टफोन च्या युगामुळे हल्लीचा प्रत्येक युवक स्मार्टफोन वर तासंनतास  अपडेट राहण्याचा प्रयत्न करत असत असतो.कोपर्डी अत्याचार घटनेनंतर संपुर्ण महाराष्ट्रात त्या घटनेचे तीव्र पडसाद उमटले.ठिकठिकाणी निषेध व्यक्त करण्यात अाला.अगदी अल्पावधीत महाराष्ट्रभर लोळ पसरु लागले.त्यातुनच अन्याया विरोधात एक ठिणगी पेटुन मराठा क्रांती मोर्चा चा जन्म झाला.

एक मराठा-लाख मराठा अशा अाशयाचे मेसेज सोशल मिडिया सह सगळीकडे धडकत अाहेत.नेटीझन्स कडुन  विशेष मोहिम राबविली जात अाहे.महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये या अांदोलनासाठी मराठा रस्त्यावर उतरले आहे. यात बहुसंख्येने महिला, शाळेकरी मुली, मराठा समाजाचे युवा आणि वृद्ध सामील होताहेत. त्याचप्रमाणे ठिकाठिकाणी गावबैठका अायोजित केल्या जात असुन मोर्चासंबंधी अाखनी केली जात अाहे.

नुकत्याच झालेल्या नांदेड तसेच इतर ठिकाणच्या मोर्चांना लाखोंच्या संख्येने मराठा समाजबंाधव उपस्थित होते.या वेळी उपस्थित विराट लोकसंख्येने गर्दीचा अक्षरश: उच्चांक मोडला.

राज्यात अाजपर्यंत विविध अादोलने केली गेली.वारंवार मोर्चे काढले.अांदोलने मोर्चे ब-याचवेळा हिंसक उद्रेक होताना अनेकवेळा दिसला अाहे.परंतु गेल्या अाठवडाभरात तसेच अगदी कालपर्यंत झालेल्या मोर्चा चे वैशिष्ट्य म्हणजे शांततेत सुरु असलेले अागळे वेगळे अहिंसक पद्धतीचे अांदोलन !

अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने लाखोंच्या संख्येने निघणा-या मोर्चा मुळे कुठं जाळपोळ नाही कि कुठं तोडफोड नाही. वाहतुक व्यवस्थेवर ताण नाही कि पोलीस व्यवस्थेला अाव्हान नाही.स्वयंस्फुर्ती ने निघणा-या मोर्चामध्ये केवळ पुरुषच नाही तर अाबालवृद्धांपासुन महिला,शाळकरी मुली,कॉलेज युवतींचा सहभाग निश्चित कौतुकास्पद च म्हणावा लागेल.

काय अाहे मागणी?

पहिली मागणी अाहे कोर्पर्डी बलात्कार आणि हत्येच्या आरोपींना फाशीची शिक्षा.दिल्लीतील निर्भया घटनेनंतर महाराष्ट्रात ग्रामीण भागात कोपर्डी सारख्या छोट्या गावात अत्यंत निंदनीय अत्याचाराची घटना घडली.सदर घटनेत अारोपींनी क्रोर्याची सीमा पार करत पिडितेचा अनन्वित छळ केला.या घटनेनंतर पुन्हा असे कृत्य घडु नये.महिला व मुलींवर अन्याय करताना अारोपींवर दहशत निर्माण व्हावी, याचमुळे या घटनेतील दोषींना फाशीचीच शिक्षा व्हावी अशी मागणी मोर्चेकरांची अाहे.

त्याचबरोबर दुसरी मागणी अाहे अॅट्रोसिटी कायदा रद्द करण्याची.अॅट्रोसिटी कायद्याचा दिवसेंदिवस गैरवापर होउ लागल्याने या कायद्यात बदल व्हावा अन्यथा रद्द व्हावा अशा पद्धतीने मागणी केली जात अाहे. शिक्षण व नोकरीत अारक्षण मिळावे हि अाहे तिसरी मागणी.मराठा समाजातील गरीब घरात युवकाकडे गुणवत्ता असुन देखिल केवळ ब-याचवेळ डावलेले जात अाहे.त्यामुळे नोकरीत व शिक्षणात देखिल अारक्षण मिळावे हि मागणी केली गेली अाहे.
 
उठ मराठा जागा हो..!
या मराठा आंदोलनाचे नेतृत्व कुठलेही पक्ष करत नाही अथवा व्यक्तिगत कोणीकरत नाही तरी देखील यात लाखोंच्या संख्येने लोक सामील होत आहे. महाराष्ट्रात सर्वात पहिला  मराठ्यांचा मोर्चा मराठवाडाच्या औरंगाबादमध्ये निघाला. येथूनच याची सुरुवात झाली आणि आता या आंदोलनाची आग संपूर्ण राज्यात पसरत आहे.काल झालेला नांदेड मोर्चा  हा ऐतिहासिक ठरणार अाहे.त्याचबरोबर फलटन,इंदापुर अादी भागातील गर्दी लक्ष वेधुन घेणारीच ठरली.

मोर्चा अन मिडिया
व्हॉट्सअप, फेसबुक,ट्विटर या सोशल मिडियावर प्रचंड मेसेज व्हायरल  होत असुन सर्वच व्हॉटसअप ग्रुप चा डिपी(ग्रुप अायकॉन) बदललेला दिसत अाहे.त्याचप्रमाणे जनजागृती करणारे मेसेज देखिल मोठ्याप्रमानावर होत अाहे.त्याचप्रमाने इलेक्ट्रॉनिक मिडिया ला देखिल या अांदोलनाची दखल घेणे भाग पडले अाहे. 
 
नव्या युगाची क्रांती
मराठा मुक मोर्चा ना स्वयंस्फुर्ती ने सहभागी होणा-या बांधवामुळे एक वेगळीच उंची प्राप्त होत असुन तरुणवर्गाचे हे मोठे यश म्हणावे लागेल.अाजवर कधी हि एवढी एकि पहायला मिळाली नाही.परंतु या निमित्ताने अखिल समाजबांधव एकवटला जात असुन इतिहासात 'न भुतो न भविष्यती' अशा प्रकारची अागळी वेगळी  नोंद न झाली तर नवलच. त्याचप्रमाणे युवक एकञ अाला तर काय करु शकतो हे देखिल या वेळी प्रकर्षाने अनुभवयास मिळत अाहे.इतर देशांप्रमाणे अापल्या देशात या निमित्ताने नव्या क्रांतीस सुरुवात झाली अाहे असेच  अाता म्हणावे लागेल.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या