महावितरण कर्मचाऱ्यास लाच घेताना अटक

तळेगाव ढमढेरे ,  ता.२१ सप्टेंबर २०१६ (जालिंदर अादक) : येथील विद्युत सहायकास लाचखोरीप्रकरणी रंगेहाथ पकडण्यात अाले.

अमोल मुरलीधर पाटील असे या विद्युत सहायकाचे नाव असुन यास ५५०० रुपये घेताना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेजारील
हॉटेलमध्ये लाचलुचपत विभागाच्या अधिका-यांनी लाच घेताना रंगेहाथ पकडले अाहे

सविस्तर माहिती अशी कि,तळेगावातील घराचे काम चालू असताना विद्युत वाहक तारा आड येत असल्यामुळे त्या तारा दुसरीकडून वळवून देण्यासाठी वीजवितरणचे कर्मचारी पाटील यांनी संबंधित घरमालकाकडे पैसे मागितले. त्या संदर्भात तक्रारदाराने पुण्याच्या लाचलुचपत कार्यालयात तक्रार दिल्यानंतर  लाचलुचपत खात्याच्या अधिका-यांनी सापळा रचला.त्यानुसार पाटील यास ५५०० रुपये घेताना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेजारील हॉटेलमध्ये लाचलुचपत विभागाच्या अधिका-यांनी लाच घेताना रंगेहाथ पकडले व त्यास ताब्यात घेतले. यावेळी डी.वाय.एस.पी. सुनील यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आर.टी.चव्हाण, पो.ह.सुनील शेळके, पो.ना.श्रीकृष्ण कुंभार चालक पी.एस.आय लोंडे यांनी हि कारवाई केली.

दरम्यान महावितरणच्या कार्यालयातील कर्मच्या-यांनी ठेकेदाराला दिलेल्या कामात लुडबुड केल्यास काय होते याचे हे उदाहरण मिळाल्यामुळे भितीचे वातावरण झाले आहे. तसेच  पाटील हा नुकताच कामाला लागला होता आणि असे काही करील याची कोणालाच खात्री पटत नसल्याची कुजबुज परिसरात चालू होती.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या