डेंग्यु ने एकाचा मृत्यु; साथीच्या अाजाराचे थैमान

कवठे यमाई ,  ता.२१ सप्टेंबर २०१६ (प्रा.सुभाष शेटे) : सरदवाडी (जांबूत) येथील जानकू गेणू गांजे (वय ४0) यांचे सोमवारी (दि. १९) पुण्यातील खासगी दवाखान्यात डेंगीच्या आजाराने निधन झाले. त्याचबरोबर शिरुर पुर्व भागात देखील या अाजाराचे अनेक संशयित अाढळुन येत अाहेत.

जानकू गांजे यांना आठ दिवसांपूर्वी डेंगीची लागण झाली होती. ताप आला म्हणून ते स्थानिक डॉक्टरांकडे उपचार घेत होते. परंतु एवढे करूनही ताप कमी होत नसल्याने त्यांनी शिरूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये जाऊन तपासणी केली असता त्यांना डेंगीच्या आजाराची लक्षणे जाणवली. तेव्हा गांजे यांना नातेवाईकांनी पुणे येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. परंतु आजार आवाक्याबाहेर गेल्याने त्यांचा सोमवारी मृत्यू झाला. त्यांच्यावर मंगळवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

टाकळी हाजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी ​डॉ . ​दिनेश महाजन यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की ,"सरदवाडी परिसरामध्ये आम्ही समक्ष पाहणी केली या ठिकाणी डेंगू सदृश अशी परिस्थिती दिसत नाही .संपुर्ण परिसराची पाहणी केली डेंगूचे मच्छर अथवा त्यांची अंडी आढळून आलेली नाही​. ​तरीही या ठिकाणी धुळफवारणी ​करण्यात ​असून या ठिकाणी योग्य त्या ​प्रतिबंधात्मक ​उपाययोजना राबवण्याचे काम चालू आहे.

नागरिकांनी आठड्यांतून एक दिवस कोरडा पाळून नांगरिकांनी स्वच्छता राखण्याचे ​व परिसर स्वछ ठेवण्याचे ​आवाहन ​डॉ. ​महाजन यांनी केले आहे.

शिरुर च्या पुर्व भागात देखील अनेक संशयित अाढळुन येत असुन मांडवगण फराटा परिसरात १५-२० रुग्णांना डेंगीची लागण झाल्याची शक्यता वर्तवली जात अाहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या