शिरुर पोलिस निरिक्षकाची सरपंच, उपसरपंचाला अरेरावी

शिरूर, ता.२२ सप्टेंबर २०१६ (संपत कारकुड) : अतिक्रमणाचे निराकरण करण्यासाठी गेलेले सादलगाव ग्रामपंचायतीचे महिला सरंपच, उपसरपंच तसेच तंटामुक्तीचे सदस्य, आणि ग्रामस्थांना शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक दयानंद गावडे यांनी अर्वाच्य भाषेत बोलुन झिटकारले.


सविस्तर हकिकत अशी कि,पोलिस निरिक्षक दयानंद गावडे यांनी महिला सरपंचासह, उपसरपंच आणि सोबत आलेल्या सदस्यांना आरेरावीची भाषा वापरुन, तुम्ही मला अक्कल शिकवू नका, जागा मोजली आहे, त्यावर अतिक्रमण आहे, ते मोकळे करा, जागा मोजणी करत असतांना तुम्ही काय झोपले होते का? आपण सांगतो तेच खरे आहे, तुम्ही सांगता ते सर्व खोटे आहे.,  अशा अर्विभावात शिरुर पोलीस स्टेशन ला न्याय मागण्यासाठी अालेल्या सर्वांना गावडे यांनी अपमानित करुन पाठविले. तसेच ग्रामपंचायत सदस्यामधील एक ज्येष्ठ सदस्य व विषेश कार्यकारी पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीस तु कोण? असा एकेरी शब्द वापरुन त्याला बोलु दिले नाही. सोबत आलेल्या पत्रकारालाही मला कोणाची शिफारस चालत नाही, आपण बोलतो तेच सत्य आहे, तुमची ओळख सांगण्याची गरज नाही, आणि तुम्ही जे सांगत आहात ते सर्व काही खोटे आहे. अशा भाषेत ज्येष्ठ पञकाराला देखिल या वेळी अपमाणित करण्यात अाले.

सामान्यांना योग्य तो न्याय देण्यासाठी खुर्चीवर बसविलेले असे अधिकारीच जर पदाधिका-यांना उद्धट भाषा वापरत असतील तर सर्वसामान्यांकडुन पोलिसांबाबत कोणत्या चांगल्या अपेक्षा ठेवायच्या हे या प्रकरणांमुळे समोर येत आहे. नुकत्याच शिरुर मधील नगरसेवकांच्या खुनाच्या घटनेवेळी याच पोलिस निरिक्षकांना संतप्त जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. आणि आता ग्रामपंचायत सादलगाव येथील नागरिकांना आलेला अनुभव पाहता निरिक्षक साहेबांच्या कामकाजावर सगळीकडे नाराजीचा सूर असून पोलिस निरिक्षकाचे कामकाम व कार्यपध्दतीवर आता शंका घेण्यास जागा निर्माण झाली आहे.

जनतेला नेमके काय पाहिजे, हे या पोलिस निरिक्षकांना समजते की नाही, असा संतप्त सवाल पोलिस निरिक्षक गावडे यांचा अनुभव घेतलेल्या प्रत्येक नागरिकांकडुन सध्या होत असून या साहेबांनी येथे आल्यापासुन नागरिकांची बोलती बंद केली आहे.

या साहेबांचे गेली दोन महिन्यात आपल्या केबिनमध्ये बसून सामान्य नागरिकांचे केलेले निवाडे सिसि टीव्हीद्वारे तपासण्याची मागणी समोर येत आहे. साहेबांनी जरा सामान्यांचे प्रथम प्रश्न समजुन घ्यावेत, त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी संधी द्यावी, केवळ आपलेच म्हणणे खरे आहे अणि तेच येणा-यांच्या गळी उतरविण्याचा प्रकार ताबडतोब थांबवावा, अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरतील असे येथे अनुभव आलेल्या नागरिकांनी आमच्या प्रतिनिधीकडे प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या