वार्ताहर असो कि काय असो...समजलं का?

शिरूर, ता.२४ सप्टेंबर २०१६ (संपत कारकुड) : शिरुर पोलीस स्टेशन ला घडलेल्या प्रकाराबाबत ज्येष्ठ पञकाराने डिवायएसपी राजेंद्र मोरे यांना प्रतिक्रिया विचारली असता वार्ताहर असो कि काय असो.. समजलं का? अशाच भाषेत उत्तरे दिल्याने अाता पोलीसांच्या भुमिकेबाबतच प्रश्न निर्माण झाली अाहेत.

सविस्तर हकिकत अशी कि, सादलगाव येथील मोजणी झालेली बखळ जागा 1990 पर्यंत ग्रामपंचात मालकीची होती. ग्रामपंचायतीने ही बखळ कुणालाही खरेदीने अथवा हस्तांतरित न करता किंवा तसा कोणताही शासकीय आदेश नसतांनाही 1990 मध्ये पार पडलेल्या सिटी सर्व्हेमध्ये तत्कालिन सत्ताधा-यांनी संगनमताने मालकी हडप केली. संबंधित जागा बखळ स्वरुपाची असून त्यावर सध्या सार्वजनिक जाण्या-येण्याचा जुना रस्ता, जुने 10 बाय 12चे घर आणि अलिकडे उभी केलेली 10 बाय 12 ची लोखंडी टपरी आहे. मोजणी केलेली जागा बळकविल्याचे लक्षात आल्यानंतर खडबडुन जागे झालेले ग्रामपंचायतीचे सध्याचे सरपंच, उपसरपंच, तंटामुक्तीचे सदस्य, ग्रामस्थ इत्यादी सिटी सर्व्हेकडील मुळ चौकशी उतारे घेवून पोलिस निरिक्षक दयानंद गावडे यांना समजुन सांगण्यासाठी गेले असता सरपंचासह आलेल्यांना धुडकावुन लावून आम्हाला अक्कल शिकवू नका, आत्तापर्यंत झोपले होते का? पोरगळ बारगळ काहीतरी सांगता... अशा अर्वाच्य भाशेत बोलून गावडेंनी अपमानित केले होते.

या संदर्भात डीवायएसपी राजेंद मोरे यांच्याकडे गावडे प्रकरणाविषयी प्रतिक्रिया घेण्यासाठी  भ्रमणदुरध्वनीवरुन संपर्क केला असता, ‘वार्ताहार असो कि कोणी,’. ‘तुम्ही फोनवर सारखं बोलु नका’, ‘ऑफीसला भेटा’, ‘समजलं का !’ अशाच उर्मट व दमदाटी च्या  भाषेत डीवायएसपी मोरे यांनी ज्येष्ठ पञकाराला प्रतिक्रिया दिली.

दरम्यान ग्रामपंचायत मुळ मालकीची आणि सध्या मोजणी झालेली जागा रस्त्यावरच येत असल्यामुळे रस्ता त्वरित खुला करुन मिळावा म्हणुन ग्रामपंचायत सादलगावच्या वतीने मा. तहसिलदार शिरुर यांच्याकडे (दि. 22) रोजी दावा दाखल झाला आहे.मोजलेल्या जागेबाबत येथील नागरिक आता जागृत झाले असून आपल्या हक्काचा रस्ता लाटण्याचा डाव हानुन पाडण्यासाठी सज्ज झाले आहेत.


संकेतस्थळ ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ ने हे प्रकरण उचलुन धरल्यामुळे ग्रामस्थांना मोठा आधार मिळाला असून ग्रामस्थांबरोबर गावडे साहेबांनी केलेल्या वर्तनाच्या बातमीने सोशल मिडियावर चांगलाच धुमाकुळ घातला आहे. तसेच या प्रकरणाची संपूर्ण पुणे जिल्हयात मोठी चर्चा रंगु लागली आहे.


शिरुर पोलीसांची नगरसेवक मल्लाव खुन प्रकरणात नाचक्की झाली असतानाच हा दुसरा अपमानास्पद प्रकार घडलेला असताना तालुक्यातील अनेक पुढारी तसेच शिरुर परिसरातील नागरिक पोलीसांच्या अशा वर्तनाबाबत नाराजी व्यक्त करु लागली अाहेत.

दबंगगिरी करायची ती हि सर्वसामान्यांवरच अशा प्रतिक्रिया काहि नागरिकांनी दिल्या.तर एका पक्षाच्या पदाधिका-याने देखिल नाव न छापण्याच्या अटी वर बोलताना सांगितले कि या पोलीसांकडुन पुढारी, सर्वसामान्य वाहनचालक यांनाच लक्ष्य केले जाते मग मोठे अवैध धंद्यांवर का  कारवाई केली जात नाही असा सवाल देखिल या पदाधिका-याने बोलताना केला.


Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या