पोलीस व पत्रकारांच्या वतीने शहीद जवानांना आदरांजली

शिक्रापूर ,  ता.२७ सप्टेंबर २०१६ (प्रा.एन.बी.मुल्ला) : उरीतील भ्याड हल्ल्याचा शिक्रापूर येथे पोलीस व पत्रकारांच्या वतीने निषेध करून शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली

शिक्रापूर  येथे शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचा-यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.गणेशोत्सव काळात चोख बंदोबस्त ठेवून शांततेत गणेशोत्सव व गणेश विसर्जन पार पाडल्याबाबत शिक्रापूरचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक रमेश गलांडे व त्यांच्या सहका-यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ, पोलीस उपनिरीक्षक चेतन थोरबोले, मराठी पत्रकार संघाचे विभागीय सचिव शरद पाबळे, ज्ञानेश्वर मिडगुले, सुनिल भांडवलकर, प्रा.एन.बी.मुल्ला, प्रविणकुमार जगताप, प्रा.संजय देशमुख, प्रा.नागनाथ शिंगाडे, राजाराम गायकवाड, शेरखान शेख, जालींदर आदक आदी उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना पोलीस निरीक्षक रमेश गलांडे म्हणाले की पोलीसांच्या कामगीरीचे मुल्यमापन करून दर महीण्याला एका पोलीस कर्मचा-याला पुरस्कार देवून सन्मानीत करून त्यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

पोलीस व पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्याचेही याप्रसंगी निश्चित करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद पाबळे यांनी केले तर प्रविणकुमार जगताप यांनी सुत्रसंचालन केले.


Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या