वेळ नदीवरील पूल पुराच्या पाण्याने गेला वाहून

तळेगाव ढमढेरे,  ता.२९ सप्टेंबर २०१६ (प्रा.एन.बी.मुल्ला) : तळेगाव ढमढेरे व टाकळी भिमा या गावांना जोडणारा वेळ नदीवरील पूल पुराच्या पाण्याने वाहून गेल्याने तळेगाव ढमढेरे परीसरातील वाडया वस्त्यांचा या गावांशी संपर्क तुटला अाहे.

विद्यार्थ्यांना देखील शाळेत जात येत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे विद्याथ्र्यांचे शैक्षणिक हित डोळयासमोर ठेवून व परीसरातील नागरीकांच्या सोयीचा विचार करून तातडीने या पुलाचे काम करण्याची मागणी परीसरातील नागरीकांनी केली आहे.
     
तळेगाव बाजारतळाच्या पुर्वेला वेळ नदीवर टाकळी भिमा व पूर्वेकडील तळेगावच्या वाडया वस्त्यावर जाण्या येण्यासाठी छोटा पुल आहे.या पुलाची उंची कमी असल्याने तसेच यावर भरावासाठी माती टाकली होती तर नदीचे पाणी वाहण्यासाठी वापरलेल्या जलवाहीण्या देखील छोटया असल्याने पावसामुळे नदीला पूर आल्याने पाण्याच्या प्रचंड दाबामुळे हा पुल व पुलाचा भराव रस्ता वाहून गेला आहे.

तळेगाव ढमढेरे व टाकळी भिमा या दोन गावांना जोडणा-या या रस्त्याचा वापर जगताप वस्ती, चौधरी वस्ती, गुरव मळा, कमेवाडी, शिंदे वस्ती, देंडगेवस्ती, साळु–माळु वस्ती व टाकळी भिमा येथील नागरीक करतात.पुल वाहून गेल्याने या वाडया वस्त्यांचा व टाकळीचा तळेगावशी संपर्क तुटला असून नागरीकांची मोठया प्रमाणात गैरसोय होत आहे.

या रस्त्यावरील वाहतुकही पूर्णपणे बंद झाली आहे.विद्यार्थ्यांना देखील शाळेत येता येत नाही.तरी प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेवून नागरीकांच्या व विद्याथ्र्यांच्या सोयीसाठी मोठया जलवाहीन्या टाकून व पुलाची उंची वाढवून तातडीने पुलाचे काम करण्याची मागणी परीसरातील नागरीकांनी केली आहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या