पोलीस निरीक्षक गावडेंचा ग्रामसभेत निषेधाचा ठराव

सादलगाव, ता.४ अॉक्टोबर २०१६ (संपत कारकुड) :  येथील महिला सरपंच,उपसरपंचासह ग्रामस्थांना उर्मट भाषा वापरुन अपमानित केल्याबददल ग्रामपंचायत सादलगाव यांनी दिनांक 2 ऑक्टोंबर 2016 च्या ग्रामसभेमध्ये गावडेंच्या वर्तनाच्या निषेधाचा ठराव केला आहे.

सविस्तर हकिगत अशी कि,: ता. 3 सप्टेंबर  रोजी गावातील एका जागेची मोजणी झाली. मोजणी झाल्यानंतर मोजलेली जागा ग्रामपंचायत मालकीची बखळ असल्याचे लक्षात आल्यानंतर तत्काळ ग्रामपंचायतीने मोजणीवर हरकत घेवून शिरुर येथील पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांना चुकीची बाब पुराव्यासह निदर्शनास आणुन देण्याचा प्रयत्न केला असता गावडे यांनी मात्र न्यायासाठी अालेल्या सर्वांना अरेरावी करुन उद्धट भाषा केली. गावचे प्रथम नागरिक खुद्द महिला सरपंचासह आलेल्या सर्वांना अपमाणित करुन आपलेचं म्हणने कसे खरे आहे. आणि त्याप्रमाणे जर वागला नाहीतर कारवाईची भाषा केली होती. हा सर्व प्रकार एका ज्येष्ठ पत्रकारासमोर घडला होता.

घडलेला प्रकार ग्रामपंचायतीने विशेष गांभिर्याने घेवून दिनांक 29 सप्टेंबर रोजी मासिकसभेमध्ये विशय क्रमांक 11/1 मध्ये निरिक्षक गावडेंचा निषेध व्यक्त केला. त्यानंतर महात्मा गांधी जयंतीनिमित्त घेण्यात येणा-या विशेष ग्रामसभेमध्ये हा विशेष चर्चा करुन सर्वानुमते ग्रामसभेमध्येही विषय क्रमांक 9/1 प्रमाणे निषेधाचा ठराव करण्यात आला. या ठरावाच्या प्रती जिल्हयाचे पोलिस अधिक्षक, विभागीय पोलिस अधिकारी, दौंड तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिका-यांकडे पाठविणार असल्याचे ग्रामपंचायतीद्वारे सांगण्यात आले.

शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक दयानंद गावडे यांनी  ग्रामस्थांना अपमानास्पद वागणुक दिली  असली तरी ग्रामसभेमध्ये बंदोबस्तासाठी अालेल्या पोलिसांचा सत्कार ग्रामपंचायतीने केला.Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या