युवासेनेचे पाणी समस्येबाबत खासदारांना निवेदन

टाकळी हाजी , ता.५ अॉक्टोबर  २०१६ (सतीश भाकरे ) : उन्हाळ्यातील पाण्याची समस्या कायमची दुर व्हावी या साठी युवासेनेचे तालुकाप्रमुख माऊली घोडे यांनी खासदार शिवाजी अाढळराव पाटील यांना या संदर्भात निवेदन दिले.

या वेळी साईक्रांती प्रतिष्ठाण चे विक्रम निचित,सोमनाथ भाकरे, पांडुरंग सरोदे, शिवाजी मेरगळ, मच्छिंद्र थोरात, नवनाथ पोखरकर, अादी उपस्थित होते.

शिरुर अांबेगाव युवासेनेचे तालुकाप्रमुख माऊली घोडे यांनी या भागातील नागरिकांना उन्हाळ्यात पाणी टंचाईला मोठ्या प्रमाणावर सामोरे जावे लागते.पाण्यासाठी होणारी वणवण कायमची थांबावी म्हणुन परिसराची माहिती घेतली.त्याचप्रमाणे पाटबंधारे अधिका-यांकडुन माहिती घेउन करावयाच्या उपाययोजनांबाबत विचार केला.

कुकडी नदीच्या काहि अंतरावर कुकडी डावा कालवा क्र.३८ येथुन एस्केप काढुन ते पाणी कुकडी नदीला सोडल्यास या भागातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मिटवता येउ शकतो असे निरिक्षणातुन दिसुन अाले.

या संदर्भात युवासेनेचे माउली घोडे व अादी पदाधिका-यांनी शिरुर लोकसभेचे खासदार शिवाजी अाढळराव पाटील यांना समक्ष भेटुन निवेदन सादर  केले.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या