अंबाबाई पावली नवसाला...

शिरूर , ता. ६ अॉक्टोबर  २०१६ (सतीश केदारी) : अारक्षण सोडतीत महिलांचेच अारक्षण मोठ्या प्रमाणावर निघाल्याने महिलांना नवराञीत अंबाबाई पावली  असेच म्हणावे लागेल तर दुसरीकडे पु्रुष मंडळींचा माञ सोडतीत मोठा भ्रमनिरास झाला अाहे.

शिरुर पंचायत समिती गणासाठी शिरुर तहसिल कार्यालयात व जिल्हा परिषदेत जिल्हा परिषद गटांसाठीची अारक्षण सोडत जाहिर करण्यात अाली.या झालेल्या सोडतींमध्ये जिल्हा परिषदेच्या ७ पैकी ६ गटांवर महिला व केवळ एकच गट पुरुष साठी राखीव झाला अाहे.पंचायत समिती च्या अारक्षण सोडतीत देखील १४ पैकी ७ ठिकाणी महिलांना अारक्षण निघाल्याने शिरुर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकित महिलांना प्रथमच मोठ्या प्रमाणावर संधी मिळणार अाहे.

गेल्या अनेक दिवसांपासुन इच्छुकांना निवडणुकिचे वेध लागले होते.त्यानुसार अनेकांनी प्राथमिक तयारी देखील सुरु केली होती.मतदारांच्या गाठीभेटी, तरुणांचे वाढदिवस, वेळोवेळी विधायक उपक्रम राबवुन उमेदवारी साठी प्रबळ दावेदार असल्याचे अप्रत्यक्षरित्या अनेक उमेदवारांचा निवडणुकिपुर्वीची प्राथमिक तयारी देखील तशी सुरु होती.अारक्षण सोडतीसाठी अनेकांनी अक्षरश: देव पाण्यात ठेवले होते.

अारक्षण सोडत महिलांना जाहिर होताच पुरुष उमेदवारांना मोठा भ्रमनिरास झाला असुन विद्यमान सत्ताधा-यांना देखील मोठा झटका बसला अाहे.

जाहिर झालेल्या अारक्षण सोडती पुढीलप्रमाणे :

पंचायत समिती(गण) :
(गण व अारक्षण)
१)वडगाव रासाई- अनुजाती महिला
२)केंदुर -सर्वसाधारण महिला
३)शिक्रापुर-सर्वसाधारण महिला
४)टाकळी हाजी- सर्वसाधारण महिला
५)रांजणगाव गणपती-सर्वसाधारण पुरुष
६)तळेगाव ढमढेरे- सर्वसाधारण महिला
७)शिरुर ग्रामीण- सर्वसाधारण पुरुष
८)कारेगाव-सर्वसाधारण पुरुष
९)रांजणगाव सांडस- ओबीसी पुरुष
१०)मांडवगण फराटा- ओबीसी पुरुष
११)पाबळ- सर्वसाधारण पुरुष
१२)न्हावरा-ओबीसी महिला
१३)कवठे येमाई-सर्वसाधारण पुरुष
१४)सणसवाडी-ओबीसी महिला

जिल्हा परिषद (गट) :
गट व अारक्षण
१)टाकळी हाजी-कवठे येमाई : सर्वसाधारण महिला
२)शिरुर ग्रामीण-न्हावरे    : सर्वसाधारण
३)कारेगाव- रांजणगाव गणपती : सर्वसाधारण महिला
४)पाबळ- केंदुर   : सर्वसाधारण महिला
५)शिक्रापुर-सणसवाडी : ओबीसी महिला
६)रांजणगाव सांडस- तळेगाव ढमढेरे : सर्वसाधारण महिला
७)वडगाव रासाई- मांडवगण फराटा : सर्वसाधारण महिला

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या