गावठी पिस्तुल व काडतुसे शिरुर पोलीसांकडुन जप्त

शिरूर , ता. ९ अॉक्टोबर  २०१६ (प्रतिनीधी) : शिरुर पोलीसांनी गस्त घालत असताना गावठि पिस्तुल व जिवंत काडतुसे जप्त केली असल्याची माहिती शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी दिली.

या वेळी अधिक माहिती देताना सांगितले कि, शनिवारी राञी(ता.८) रोजी पोलीस उपनिरीक्षक एस.एस. वाघमोडे हे सहकारी संतोष अौटी, उमेश भगत, संजय जाधव, कर्मचारी पखाले अादी नवराञानिमित्त गस्त घालत असताना एक इंडिका  कार(MH-01-GA-6514) हि संशयास्पद रित्या फिरताना अाढळुन अाली.

यावेळी पोलीसांनी बारकाईने चौकशी केली असता चालकाच्या शिटखाली गावठी बनावटीचे पिस्तुल व तीन जिवंत काडतुसे निदर्शनास अाली.या वेळी कारमधील तिघांना ताब्यात घेतले असता चौकशीदरम्यान नारायण नायर गव्हाणे(रा.कोहोकडी,पारनेर) हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असल्याचे समजले.

या प्रकरणी तिघांना अटक केली असल्याची माहिती पोलीसांनी दिली असुन पुढील तपास निरिक्षक दयानंद गावडे हे करत अाहेत.(सविस्तर वृत्त लगेचच...)
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या