...तो फिरतोय समाजासाठी महाराष्ट्रभर

शिरूर , ता. ९ अॉक्टोबर  २०१६ (सतीश केदारी) : पारधी समाज म्हटलं कि सर्वप्रथम सगळ्यांच्या चेह-या समोर अाठवतो तो चोर गुन्हेगार.पण याच समाजाच्या न्याय व हक्कासाठी, समाजाच्या परिवर्तनासाठी महाराष्ट्रभर फिरतोय मराशीकार नामदेव भोसले.गुन्हेगारीतुन सुमारे १४७० कुटुंबांना बाहेर काढले असल्याचे भोसले सांगत होते..

पारधी समाज म्हणजे स्वातंञ्यानंतरही उपेक्षित राहिलेला.अाज हि समाजाच्या एका  कोप-यात खितपत पडलेला अाहे न्याया च्या प्रतिक्षेत.ना समाज चांगला म्हणतो ना पोलीस. गुन्हेगारीचा शिक्का  कायमच माथी बसलेला असा हा समाज.पोलीसांच्या नेहमी चोर गुन्हेगार म्हणुनच नेहमी रडारवर असतो.

उरुळी कांचन येथील नामदेव भोसले काल भेटले ते एका पालावर.समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी अाले होते.पारधी समाजाविषयी भरभरुन सांगत होते.त्या वेळी बोलताना सांगितले कि पारधी संघटनेचे काम सोडल्यानंतर अाजतागायत वैयक्तिक गाठी भेटी घेत अनेकांच्या व्यथा जाणुन घेत सुमारे १४७० कुटुंबांना गुन्हेगारी च्या खाईतुन बाहेर काढले.त्याचबरोबर अनेकांच्या समस्या सोडवल्या अाहेत.त्या द्वारे मनपरिवर्तन करुन मुक्तपणे जगण्याची नवी संधी निर्मान करु दिली अाहे.

नामदेव पुढे बोलताना सांगत होते कि, कुठे दरोडा पडला,चोरी झाली कि, थेट पालावर येउनच पोलीस बायका-पोरांसह पोलीस धरुन नेत असे.जोरात मारधोड करत असे.त्यातुन अनेकांची कुटुंबे उद्धवस्त होत होती.त्यामुळे समाजातील मुले, महिला पुरुष घाबरुन रानावनांत भटकु लागत असे.मिळेल ते खायचे,प्रसंगी उपाशी जीवन जगायचे अशा पद्धतीने जीवन जगत असे. यातुन गुन्हेगारी चा शिक्का बसलेल्या तरुणांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत असे.व पुन्हा नैराश्यापोटी अनेक पुन्हा गुन्हेगारीकडे वळत असे.हे मनाला खटकु लागल्याने समाजाच्या परिवर्तनसाठी अायुष्य घालवायचे असे मनोमन ठरवुन फिरु लागलो.

नामदेव भोसले हे पोलीस अधिकारी,सरकारी अधिकारी यांच्याशी भेटुन ताळमेळ राखत समाजाच्या अडचणी मांडत अाहेत.त्याचप्रमाणे मुलांच्या व समाजातील घटकांना विचारात घेत त्यांच्या मनातील असलेली असुरक्षिततेची भिती,असमानतेची दरी घालवण्यासाठी प्रयत्न करत अाहेत.त्यांच्या कार्याविषयी व संघर्षाविषयी नुकतेच 'मराशी' हे पुस्तक प्रसिद्ध झाले अाहे.

समाजासाठी भरीव काम करणार असल्याचे भोसले यांनी संकेतस्थळ www.shirurtaluka.com  शी बोलताना सांगितले.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या