पतिराजांनी पत्नींना तिकिटासाठी कंबर कसली

तळेगाव ढमढेरे,  ता.११ अॉक्टोबर २०१६ (प्रा.एन.बी.मुल्ला) : शिरुर तालुक्यातील अनेक ठिकाणी महिला अारक्षण मोठ्या प्रमाणावर अाल्याने पतिराजांनी पत्नीला तिकिट मिळावे यासाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केल्याचे चिञ पहावयास मिळत अाहे.

तळेगाव ढमढेरे – रांजणगाव सांडस जिल्हा परीषद गट हा महिला खुल्या गटासाठी आहे.महिलासाठी  हा गट खुला झाल्याने पतीराजांनी आपल्या कार्याची पक्षाने दखल घेवून पत्नीला तिकीट मिळवून देण्यासाठी कंबर कसल्याचे चित्र सर्वच राजकीय कार्यकर्ते करत आहेत.तर हा गट खुल्या महिलासाठी असल्याने व खुल्या गटातून कोणत्याही प्रवर्गाची उमेदवार दावा करू शकत असल्याने सर्वच प्रवर्गातील इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.मात्र पक्षाने तिकीट वाटप करताना अन्य गटा मध्ये इतर प्रवर्गांना आरक्षण असल्याने या गटासाठी  त्यांचा विचार करण्याची आवश्यकता नसल्याचा सुर सर्व साधारण खुल्या गटातून आहे.

जिल्हा परीषद निवडणुकीसाठी अजून बराच अवधी आहे.तिकीट वाटपही अद्याप कोणत्याच पक्षाचे नाही तरीही आरक्षण सोडत जाहीर होताच  इच्छुक उमेदवारांनी प्रचाराला सुरवात केली आहे.इच्छुक उमदवारांनी सध्या मतांचा गठ्ठा असणा-या मतदारांशी व नातेवार्इकाशी संपर्क वाढविला असून आपल्या उमेदवारी विषयी व मतदानाच्या आकडेवारी विषयी चर्चा करून त्यांचे मत जाणून घेत आहेत.तळेगाव ढमढेरे – रांजणगाव सांडस जिल्हा परीषद गटात इच्छुकांची संख्या वाढतच चालल्याने आता पासूनच चुरशीचे वातावरण निर्माण झाले आहे.प्रचाराची रंगीत तालीम देखील सुरू  झाली आहे.पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी सर्वच पक्षात शक्तीप्रदर्शन होत असून पक्षाची  उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष लढण्याची देखील कांही उमेदवारांची तयारी असल्याचे दिसत आहे.

प्रमुख इच्छूक उमेदवारामध्ये भाजपच्या वतीने शिरूर पंचायत समितीचे विद्यमान सदस्य राजेंद्र भुजबळ यांच्या पत्नी विद्या राजेंद्र भुजबळ, ,भाजपचे विद्यमान जिल्हा सरचिटणीस व भाजप प्रदेश युवा मोर्चाचे माजी सचिव डॉ.राजेंद्र  ढमढेरे यांच्या पत्नी प्रतिभा महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा तसेच समता शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालीका उषातार्इ राजेंद्र ढमढेरे, भाजपचे युवा कार्यकर्ते संभाजी ढमढेरे यांच्या पत्नी दिपाली संभाजी ढमढेरे या तिन्ही उमेदवारांनी आपल्यालाच पक्षाचे तिकीट मिळणार असा दावा केला असून मोर्चे बांधणी व शक्तिप्रदर्शनही सुरू केले आहे.तर आमदार बाबुराव पाचर्णे व पक्षाची निवड समिती जो निर्णय घेर्इल  तो आपल्याला मान्य असल्याचे भाजपाचे प्रदेश सदस्य शिवाजीराव भुजबळ यांनी सांगीतले.

राष्ट्रवादीच्या प्रमुख इच्छुकात शिरूर पंचायत समितीच्या माजी सभापती आरती भुजबळ, शिरूर कॄषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती यशवंत ढमढेरे यांच्या पत्नी नयन यशवंत ढमढेरे, शिरूर कॄषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उप सभापती अनिल भुजबळ यांच्या पत्नी संगीता अनिल भुजबळ , माजी सरपंच विश्वास ढमढेरे यांच्या पत्नी कल्पना विश्वास ढमढेरे, राष्ट्रवादी लिगल सेलचे तालुकाध्यक्ष संपत ढमढेरे यांच्या पत्नी श्वेता संपत ढमढेरे, आप्पासाहेब बेनके यांच्या पत्नी शिरूर पंचायत समितीच्या माजी सदस्या छायातार्इ आप्पासाहेब बेनके,जिल्हा बँकेचे संचालक निवॄत्तीअण्णा गवारे यांची मुलगी रंजना संजय ढमढेरे ,शिरूर पंचायत समितीचे माजी सदस्य सुनिल वडघुले यांच्या पत्नी शारदा सुनिल वडघुले, घोडगंगाचे संचालक संतोष रणदिवे, यांनीही उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार असून आपल्या पत्नीला किंवा घरातील महिलेला उमेदवारी मिळणार असल्याचा दावा केला आहे.

काँग्रेस पक्षाच्या वतीने सक्षम उमेदवार देणार असल्याचे तालुकाध्यक्ष कौस्तुभ गुजर, अरविंददादा ढमढेरे व विद्या बँकेचे संचालक महेश ढमढेरे यांनी सांगितले.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या