अामदाबादला जलयुक्त शिवार योजना यशस्वी

आमदाबाद , ता. १८ अॉक्टोबर  २०१६ (सतीश केदारी) : येथे सामाजिक बांधिलकी जपत सायबेज अाशा ट्रस्ट या कंपनीने जलयुक्त शिवार योजने अंतर्गत नाल्याचे खोली व रुंदीकरण केल्यानंतर तलाव पुर्ण क्षमतेने भरला असुन गावाला अागामी काळात मोठा फायदा होणार असल्याची माहिती अामदाबाद चे नितीनअण्णा थोरात यांनी दिली.

दिवसेंदिवस पावसाचे कमी झालेले प्रमाण यामुळे पाण्याची पातळी खोलवर जाऊ लागली.त्यामुळे दुष्काळ व पाणी टंचाई कमी करण्यासाठी परीसरातील नाला खोलीकरण व रूंदीकरण करणे आवश्यक आहे.

याची जाणीव होऊन सामाजिक जाणिवेतुन पुण्यातील सायबेज अाशा ट्रस्ट या कंपनी ने नाला खोलीकरणाचे काम हाती घेतले. त्यातून आमदाबाद मध्ये नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम पुर्ण करण्यात अाले.

नुकत्याच झालेल्या पावसाने  खोलीकरण केलेला तलाव पुर्ण क्षमतेने तलाव भरला असुन तलावाची पाणी साठवण क्षमता लाखो लिटर ने देखिल वाढली असल्याचे थोरात यांनी सांगितले.तसेच परिसरात पाणी पातळी देखिल वाढली असणार अाहे.

या कामात गावचे सरपंच योगेश थोरात, उपसरपंच संदीप जाधव,सायबेज ट्रस्टचे  प्रशांत महामुनी,अभियंते ऋषीकेश पवार,वंदना थोरात,पाणी पुरवठा अध्यक्ष नितीनअण्णा थोरात, मतीन शेख, धमेंद्रसिंह महिंद्रा, दिनेश दाफ, स्नेहा आनंद आदींनी मोठे परिश्रम घेतले.

या तलावात लाखो लिटर पाणी साचु लागल्याने एकप्रकारे गावाला याचा उन्हाळ्यात मोठा फायदा होणार असुन ग्रामस्थांच्या वतीने सायबेज अाशा ट्रस्ट चे ऋषीकेश पवार,प्रशांत महामुनी व सहका-यांचे अाभार व्यक्त करण्यात येत अाहे.


Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या