धडकेत तरुणाचा जागीच मृत्यु

कवठे यमाई , ता. २० अॉक्टोबर  २०१६ (सुभाष शेटे) :  जांबुत -फाकटे रस्त्यावर दोन दुचाकींच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू  झाला असून  दोनजण जखमी झाल्याची घटना घडली.किसन तुकाराम गावडे (वय-२८) असे अपघातात मयत तरुणाचे तरुणाचे नाव अाहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार (ता.१८) रोजी सांयकाळी ५.४५ च्या सुमारास जांबुत फाकटे रस्त्यावरुन सुरेश बाळा निचित हे आपल्या साथीदार रामदास बाळा निचित दोघेही (रा.वडनेर खुर्द ता.शिरुर)हे एम एच १२एच एम ९०२० या दुचाकीने जांबुतवरून फाकटे गावाकडे जात होते.

त्याच रस्त्यावरुन फाकटे गावाकडुन किसन तुकाराम गावडे (वय २८)राहणार फाकटे ता.शिरुर जि.पुणे हे एम एच १२ एच के ८२६१ या दुचाकीने जांबुतला येत होते.जांबुत फाकटे सरहद्दीवरील मीना कालव्यानजीकच  दोन्ही दुचाकींची जोरदार समोरासमोर धडक झाल्याने किसन तुकाराम गावडे यांंच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

तर या अपघातात सुरेश बाळा निचित यांच्या तोंडाला जबर मार लागला व रामदास बाळा निचित यांचा उजवा पाय फ्रँक्चर झाला. त्यांना देखील उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले आहे .मयत किसन गावडे यांना उपचारासाठी रुग्णवाहीकेतून तात्काळ शिरुर येथील सरकारी दवाखान्यात नेले परंतु गावडे हे मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

या प्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मनोज नवसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या