अन् दशक्रिया घाटातच जागी झाली माणुसकी..!

टाकळी हाजी , ता. २२ अॉक्टोबर  २०१६ (सतीश भाकरे) : कुटुंबाची जबाबदारी असणा-या तरुणाचे अल्पवयातच निधन झाल्यानंतर उघड्या पडलेल्या कुटुंबाला सावरण्यासाठी दशक्रिया विधी च्या ठिकाणीच अनेकांनी मदतीचा हात देऊन समाजातील माणुकिचे दर्शन घडविले.


सविस्तर असे कि, माळवाडी (टाकळी हाजी) येथील व्यवसायाने इलेक्ट्रिक वायरमन असणारे बबन मच्छिंद्र रसाळ (वय-३०)हे आपल्या मोटार रिवायडींगचा व्यवसाय करुन आपला धाकटा भाऊ रोहिदास यांच्या मदतीने शेतीव्यवसाय करणारे समाजातील जेमतेम परिस्थिती असणारे एक आदर्श कुंटुब म्हणुन नावलौकिक असणारे हे कुंटुब. अतिशय हुशार मनमिळावू स्वभाव हसतमुख व्यक्तीमत्व असणाऱ्या बबनवर अतिशय दुर्दैवी वेळ येत अल्प वयात ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

बबन हा घरातील कर्ता पुरुष असल्याने सर्व कुंटूबीयांची जबाबदारी त्याच्यावर होती.त्याच्या पाठीमागे पत्नी जयश्री, मुलगा यश(वय-७), मुलगी अक्षदा (वय-५),  तसेच आई आबई, वडिल मच्छिंद्र, भाऊ रोहिदास व भावजय असा एकुण  परिवार होता.

बबनच्या   निधनाने त्यांच्या कुंटुबीयांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असतानाच अशा परिस्थितीत कुटुंब पुर्णपणे खचल्याने गावातील नागरिकांनी दशक्रिया विधी पाचव्या दिवशी धरुन कुंटूबीयांचे दुःख हलके करण्याचा निर्णय घेतला.आणि या दशक्रिया विधीच्या दिवशी माळवाडी गावातील तरुण मंडळीच्या निर्णयाने सामाजिक कार्यकर्ते प्रकाश भाकरे यांनी दशक्रिया विधीच्या घाटातच सर्व नातेवाईक,मिञमंडळी व पाहुणे मंडळीना बबन रसाळच्या दोन लहान चिमुकल्यांच्या शिक्षणासाठी भविष्यात आर्थिक अडचणी येवू नये म्हणुन आर्थिक स्वरुपात मदतीचे आव्हान केले.

त्यांच्या या आव्हानाला प्रतिसाद देत नातेवाईक मिञमंडळी सर्वांनी १०० रुपयापासून ते २१००० हजार रुपयापर्यंत स्वखुशीने मदत केली ही सर्व रक्कम जमा करता त्यांची बेरीज २ लाख ५० हजार रुपये झाली .ही सर्व रक्कम महात्मा फुले पतसंस्था माळवाडी येथे लहान मुलांच्या नावे ठेव म्हणुन ठेवण्यात येणार आहे .

या घटनेने रसाळ कुंटुब दुःख सागरात जरी बुडाले असले तरी समाजाच्या या माणुसकीच्या नात्याने माञ या कुंटूबीयांची घडी विस्कळीत होऊ नये म्हणुन हे कुंटुब सावरण्याचा केलेला प्रयत्न निश्चितच  जगाला निश्चित एक वेगळीच प्रेरणा देणारा आहे .स्पर्धेच्या युगात अजुनही आपली माणसे आपल्याच माणसांसाठी धीर देऊन सावरण्याचा प्रयत्न करत असल्याने समाजातील ' माणुसकी ' निश्चितच जिवंत असल्याचा प्रत्यय या घटनेवरुन येत आहे .

या वेळी माजी आमदार पोपटराव गावडे ,आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितेचे सभापती देवदत्त निकम,सरपंच दामू घोडे, डॉ. सुभाष पोकळे,साविञा थोरात, युवासेनेचे तालुकाप्रमुख माऊली घोडे,किसन रासकर ,डॉ. साहेबराव पानगे,  बन्सी घोडे, सोपानराव भाकरे ,माऊली ढोमे,सुभाष जगताप ,दौलत भाकरे ,आनंदा गायकवाड ,सखाराम खामकर ,सुरेश भाकरे,  या मान्यवरांसह मोठया प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या