करडे येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे अायोजन

करडे, ता. २४ अॉक्टोबर  २०१६ (सतीश केदारी) : करडे गावचे श्रद्धास्थान असलेले ग्रामदैवत श्री क्षेञपाल भैरवनाथ-श्री जोगेश्वरी  मुर्ती प्राणप्रतिष्ठापणा व कलशारोहन समारंभाच्या निमित्ताने मंगळवार ते गुरुवार च्या दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

करडे गावचे श्रद्धास्थान असलेले ग्रामदैवत श्री क्षेञपाल भैरवनाथ-श्री जोगेश्वरी माता मंदिराचे जिर्णोद्धाराचे काम नुकतेच पुर्ण करण्यात अाले.लोकवर्गणीतुन लाखो रुपये खर्चुन मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात अाला असुन वॉल कंपाउंड, भक्त निवास,अादी कामे करण्यात अाली.मंदिर परिसराला सुशोभिकरण केल्याने मंदिराला एक नवी झळाळी प्राप्त झाली असुन अधिकच अाकर्षणात भर पडली अाहे.

मंगळवार (ता.२५)पासुन धार्मिक कार्यक्रम सुरु होत असुन मंगळवारी सकाळी पुजा प्रारंभ व प्रधान संकल्प,गणपती पुजन,पुण्याह वाचन,मातृका वाचन, वसोरधारा पुजनम्,नांदीश्राद्ध, अाचार्यचरण,अग्नीस्थापन,प्रधानदेवता स्थापन व गृहयज्ञ अादी कार्यक्रम पार पडणार अाहेत.बुधवारी(ता.२६)रोजी सकाळी मुर्ती स्नपन,शिखर स्नपन,मुर्ती महाभिषेक,प्रधान होम व दुपारी ४ वा श्रींच्या मुर्तीची मिरवणुक, व धान्याधिवास, शय्याधिवास, हे प्रमुख  कार्यक्रम होणार अाहेत. तसेच गुरुवारी (ता.२७) रोजी सकाळी ८ वाजता  प्रधान होम,मुर्तीव्यास व ९ वाजता श्रींच्या मुर्तीची स्थापना व कलशारोहन अाळंदी येथील शांकरी शिवपीठा चे श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी ज्ञानचैतन्यजी महाराज यांच्या शुभहस्ते होणार अाहेत.
सदर धार्मिक कार्यक्रम ह.भ.प.श्री एकनाथ  महाराज कर्डेकर(अाप्पा) व महेश पुरुषोत्तम कुलकर्णी (करडे) या पौराहित्यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत अाहे.त्याचप्रमाणे सकाळी ११ ते १ असे ह.भ.प बाबाजी महाराज चाळक यांचे सुश्राव्य किर्तन देखिल होणार अाहे.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणुन शिवाजी भालेकर महाराज यांची असुन विधानसभेचे माजी अध्यक्ष व अामदार दिलीप वळसे पाटील, शिरुर हवेली चे अामदार बाबुराव पाचर्णे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदिपदादा कंद, माजी अामदार अशोक पवार, पंचायत समिती सभापती सिद्धार्थ कदम, चव्हानवाडी- लंघेवाडी च्या सरपंच अनिता जासुद उपस्थित राहणार अाहेत. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे संयोजन पंचायत समिती च्या उपसभापती मंगलताई लंघे, पंचायत समिती चे माजी उपसभापती राजेंद्र जासुद, करडे च्या सरपंच कविताताई जगदाळे पाटील, उपसरपंच गणेश  रोडे, भैरवनाथ लोकसेवा ग्रामविकास संस्था, समस्त ग्रामस्थ  करडे-लंघेवाडी यांनी केले अाहे.

ग्रामस्थांच्या वतीने परिसरातील नागरिकांना या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहण्याचे अावाहन करण्यात अाले अाहे. 
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या