भक्तिमय वातावरणात कलशारोहन; प्राणप्रतिष्ठा संपन्न


करडे, ता. २८ अॉक्टोबर  २०१६ (सतीश केदारी) :
करडे गावचे श्रद्धास्थान असलेले ग्रामदैवत श्री क्षेञपाल भैरवनाथ-श्री जोगेश्वरी  मुर्ती प्राणप्रतिष्ठापणा व कलशारोहन समारंभ मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला.

या साठी मंगळवारी सकाळी पुजा प्रारंभ व प्रधान संकल्प,गणपती पुजन,पुण्याह वाचन,मातृका वाचन, वसोरधारा पुजनम्, नांदीश्राद्ध,  अाचार्यचरण, अग्नीस्थापन, प्रधानदेवता स्थापन व गृहयज्ञ अादी कार्यक्रम पार पडले.बुधवारी(ता.२६)रोजी सकाळी मुर्ती स्नपन, शिखर स्नपन, मुर्ती महाभिषेक,प्रधान होम व दुपारी श्रींच्या भव्य मुर्तीची मिरवणुक काढण्यात अाली. या वेळी मोठ्या प्रमाणात महिलांसह ग्रामस्थांनी मिरवणुक सहभाग घेतला.

तसेच गुरुवारी (ता.२७) रोजी सकाळी  प्रधान होम,मुर्तीव्यास व श्रींच्या मुर्तीची स्थापना व कलशारोहन अाळंदी येथील शांकरी शिवपीठा चे श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी ज्ञानचैतन्यजी महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात अाले.
सदर धार्मिक कार्यक्रम ह.भ.प.श्री एकनाथ  महाराज कर्डेकर(अाप्पा) व महेश पुरुषोत्तम कुलकर्णी (करडे) या पौराहित्यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले .त्याचप्रमाणे ह.भ.प बाबाजी महाराज चाळक यांच्या सुश्राव्य किर्तनाचा कार्यक्रम  देखिल संपन्न झाला.

या वेळी धार्मिक कार्यक्रमाला सामाजिक, धार्मिक, राजकिय व सर्वच क्षेञातील मान्यवरांनी उपस्थिती लावली.


लाखो रुपये खर्चुन करडे गावचे श्रद्धास्थान असलेले ग्रामदैवत श्री क्षेञपाल भैरवनाथ-श्री जोगेश्वरी माता मंदिराचे जिर्णोद्धाराचे काम नुकतेच पुर्ण करण्यात अाले.लोकवर्गणीतुन वॉल कंपाउंड, भक्त निवास,अादी कामे करण्यात अाली.मंदिर परिसराला सुशोभिकरण केल्याने मंदिराला एक नवी झळाळी प्राप्त झाली तर मंदिराला या कार्यक्रमानिमित्त अाकर्षक विद्युत रोषणाईने व संपुर्ण मंदिराला केलेल्या फुलांच्या सजावटीने मंदीराच्या सौंदर्यात अाणखीनच भर पडली.

या कार्यक्रमाला व मंदिरातील श्रींच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या