यंदा फटाक्यांचा अावाज घुमलाच नाही !

शिरूर, ता. ३ नोव्हेंबर २०१६ (प्रतिनीधी) :  सोशल मिडिया च्या माध्यमातुन होत असलेल्या जनजागृती मुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीत शहरांप्रमाणे ग्रामीण भागात देखिल कमी प्रमाणात फटाके फोडले गेले. त्यामुळे कानठळ्या बसविणार्‍या मोठ्या आवाजाच्या फटाक्यांचा त्रास यंदा कमी आणि सुसह्य झाला.तर ग्रामीण भागातील बाजारपेठांमध्ये देखिल निरुत्साह दिसुन अाला.


दिवसेंदिवस सोशल मिडिया चे महत्त्व अापणांस वाढत असल्याचे दिसते. कोपर्डी अत्याचारापासुन ते मराठा क्रांती मोर्चा पर्यंत इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांपेक्षा सोशल मिडिया चा प्रभाव दिसुन अाला. त्यामुळे कि काय सोशल मिडिया वर फटाके न फोडता पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती केली गेली.त्याचप्रमाणे फटाके न फोडता दोन घास गरीबासाठी,अनाथ मुलांसाठी अशा प्रकारचे मदतीचे अावाहन देखिल सोशल मिडिया वर जास्त प्रमाणात केले गेले.तशा पद्धतीचे अनेक मेसेजेस देखिल या दिवाळीत मोठ्या प्रमाणावर शेअर होत असल्याचे पाहावयास मिळाले.

त्याचबरोबर, ‘चायना मेड’ वस्तूंवर बहिष्काराचे अस्त्र उपसण्यात आले.चिनी वस्तुंची देखिल सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर खिल्ली उडवली गेली.त्याला प्रसारमाध्यमांनी देखिल साथ दिल्याने सर्वसामान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रबोधन झाले. परिणामी, नागरिकांनी फटाके खरेदी कमी केली.

ग्रामीण भागात देखिल फटाके खरेदीचे प्रमाण झपाट्याने घटले आहे.शालेय विद्यार्थी फटाके फोडणार नाहीत, म्हणून कुटुंब प्रमुखांनी फटाक्यांची थोडी-फार खरेदी केली. त्यात परंपरा म्हणून कमी आवाजाचा माळा, वन शॉट  आणि फॅन्सी प्रकारचे फटाके पेटविले गेले.

त्याचबरोबर सोशल मिडिया च्या ग्रुप च्या माध्यमातुन केलेल्या अावाहनामुळे एकञ अालेल्या अनेक मिञांनी देखिल वंचितांना,गरजुंना मदत करत असल्याचे चिञ ठिकठिकाणी पहावयास मिळाले.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या