२८ वर्षांनंतर भेटलेले विद्यार्थी गेले अाठवणीत हरवुन

सविंदणे , ता.४ नोव्हेंबर  २०१६ (सुभाष शेटे) : येथे सुमारे २८ वर्षांनंतर  भेटलेले माजी विद्यार्थी जुन्या अाठवणीत  चांगलेच हरवुन गेले होते.

सविंदणे येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री गुरुदेवदत्त विद्यालयातील सन १९८७ च्या १० विच्या वर्गातील विद्यार्थी व त्याकाळचे शिक्षक यांचा स्नेह मेळावा नुकताच संपन्न झाला.सुमारे ३० वर्षांनंतर हे विद्यार्थी व शिक्षक एकत्रीत भेटल्याने या कार्यक्रमाला एका वेगळेच आनंदी वलय निर्माण झाले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य एल टी पाचरणे हे होते .

श्री गुरुदेवदत्त विद्यालयातील सन १९८७ च्या १० वीच्या वर्गातील सुमारे ३० विद्यार्थी या स्नेह मेळाव्यास सहकुटुंब उपस्थित होते. या तुकडीतील विद्यार्थ्यांनी ठेवलेल्या २५  हजार रुपयांच्या मुदत ठेवीच्या व्याजातुन १२ वीत प्रथम तीन क्रमांक मिळविना-या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येत आहेत. मागील ४ वर्षात १९८७ च्या १० वी च्या  तुकडीतील विद्यार्थ्यानी १,१५,००० हजार रुपयांची मदत शाळेस दिली.

 यावेळी पुढीलकाळात शक्य ती मदत करण्याचा मानस असल्याचे शाळेचे माजी विद्यार्थी व पुण्याच्या के इ एम रुग्णालयातील भूलतज्ज्ञ डॉ. खंडू पडवळ ,सोमेश्वरनगरच्या मु.सा. काकडे महाविद्यालयातील प्राध्यापीका.डॉ.जया जितेंद्र कदम (संजया ढोबळे), नवी दिल्लीच्या डॉ पंजाबराव कृषी विद्यापीठाचे सदस्य व सविंदने येथील प्रगतिशील शेतकरी बाळासाहेब लहू पडवळ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाढू बुद्रुक चे मुख्याध्यापक विठ्ठल पवार,शिवाजीराव गावडे,सत्यवान पडवळ व माजी विद्यार्थ्यानी बोलताना सांगितले.   

सुमारे २८ वर्षांनंतर एकत्रित भेटण्याचा योग या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने आल्याने  मनस्वी आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया अनेक माजी विद्यार्थी-विद्यार्थीनींनी व त्या काळातील शिक्षकांनी व्यक्त केली.

तर या तुकडीतील  अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात ऊच्च पदावर कार्यरत असल्याचे पाहून आम्हाला मोठा अभिमान व आनंद झाला असल्याची भावना त्यांच्या शिक्षकांनी व्यक्त केली.

तर १९८७ च्या काळात शिक्षकांनी दिलेल्या सर्वोत्तम ज्ञाना मुळेच आम्ही अनेकजण वेगवेगळ्या क्षेत्रात उच्चं पदावर भरारी घेऊ शकलो असल्याचे या माजी  विद्यार्थ्यानी बोलतांना सांगितले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी विठ्ठल पवार गुरुजी यांनी केले तर संयोजन बाळासाहेब लहू पडवळ यांनी केले.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या