निर्मलग्रामसाठी विशेष मोहिम हाती घेणार-संदीप जठार

शिरूर, ता. ४ नोव्हेंबर २०१६ (प्रतिनीधी) : शिरुर तालुका निर्मलग्राममध्ये अाघाडीवर असला तरी मागास राहिलेल्या गावांसाठी विशेष पुढाकार घेउन तालुका निर्मलग्राम साठी प्रयत्न करणार असल्याचे शिरुर पंचायत समिती चे नवीन बीडीओ(गटविकास अधिकारी) संदिप जठार यांनी संकेतस्थळाशी बोलताना सांगितले.

शिरुर चे गटविकास अधिकारी संजय चिल्लाळ यांच्या बदलीनंतर पंचायत समितीत संदिप जठार यांची नियुक्ती झाली अाहे.शांत व संयमी ख्याती असलेल्या जठार यांनी कार्यभार स्विकारताच निर्मलग्राम व प्रलंबित विषयांची माहिती जाणुन घेतली.त्याचबरोबर तालुक्यातील प्रत्येक भागातील प्रश्न जाणुन त्या त्या भागातील दौ-यांचे नियोजन करत असल्याचे बोलताना त्यांनी सांगितले.

या वेळी जठार यांच्या नियुक्ती मुळे पंचायत समितीत नवचैतन्य असल्याचे दिसुन येत होते.तर अनेकांनी तालुक्याला चांगला अधिकारी मिळाला असल्याची भावना व्यक्त केली अाहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या