निमगाव म्हाळुंगीच्या सैनिकांच्या घरी दिवाळी पहाट

निमगाव म्हाळुंगी ,  ता.६ नोव्हेंबर २०१६ (प्रा.एन.बी.मुल्ला/जालिंदर  अादक) :  या गावामधून देशाची सेवा करण्यासाठी सीमेवर प्रत्यक्ष ताबा रेषेवर काम जवान करत आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहाट दिवाळी कार्यक्रमाला प्रतीसाद देत सैनिक यांच्या घरी जाऊन नगारा वादन करून दिवे लावले.

एक दिवा सैनिकांसाठी हा उपक्रम सैनिकांच्या घरोघरी पणत्या लाऊन रांगोळ्या काढून नगारा वादन करून अत्यंत उत्साहाच्या वातावरणात सैनिकांच्या घरी दिवाळी पाहत साजरी करण्यात आली.

यावेळी विजय शिवले, भरत दत्तु काळे, कैलास दादाभाऊ काळे, नंदराम दत्तु चव्हाण, संतोष बाठे देशासाठी लढणाऱ्या या सैनिकांच्या निवासस्थानी पहाटेच्या शांत वातावरणात दीपोत्सवाची शोभा नयनरम्य दिसत होती. लहान मुलांची पणत्या पेटवण्याची लगबग पाहून आनंद होत होता वादकाने नगारा वाजवून आपली कला सादर करून प्रत्येक सैनिकांच्या घराजवळ त्यांच्या त्यागाला आणि धैर्याला सलाम केला.

सैनिकांच्या घरी दिवाळीचा उत्सव भारत मातेच्या जयजयकारामध्ये देशभक्तीमयवातावरण संपन्न झाले.अनेकांनी सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.अतिथी मान्यवरांच्या हस्ते वीर मातेला मिठाई देऊन दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

या कार्यक्रमाला माजी नगरसेवक मिलिंद एकबोटे माजी भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अनिल नवले, युथ फाउंडेशनचे बाप्पू काळे, वन्नेस फाउंडेशनचे राम साबळे, कामगार आघाडीचे सरचिटणीस संतोष करपे,  युवा ग्रामपंचायत सदस्य
किरण काळे, माजी सैनिक दादा यादव, नगारावादक रोहित आढाव हे मान्यवर उपस्थित होते.     
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या