टाकळी भिमात शॉटसर्किटमुळे अडीच एकर ऊस खाक

टाकळी भीमा ,  ता.६ नोव्हेंबर २०१६ (जालिंदर  अादक) :येथील दशरथ शंकर व सुदाम शंकर वडघुले यांच्या शेतातील सुमारे अडीच एकर उसाला
शॉटसर्किटमुळे भर दुपारी ऊसाला आग लागुन जळुन खाक झाला अाहे.

सविस्तर माहिती अशी कि, टाकळी भिमा येथील दशरथ शंकर वडघुले व सुदाम शंकर वडघुले या दोन शेतक-यांचा शेजारी शेजारी उस होता.काल (ता.५) नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या दरम्यान अचानक उसाने पेट घेतला.

या लागलेल्या अागीत सुमारे अडीच एकर क्षेञातील उस जळुन खाक झाला.या भागात  अनेक शेतकऱ्यांचे बहुतेक ऊसाचे पीकावर उदरनिर्वाह चालू आहे अश्यातच दोघा शेतकऱ्यांच्या ऊसाला शॉटसर्किटमुळे आग लागल्यामुळे तोंडाशी आलेला घास ऐंन दिवाळीत हिरावून घेतला गेला अाहे.या घटनेची माहिती कळताच कामगार तलाठी गणेश घुमे यांनी घटनास्थळी भेट देउन पाहणी केली अाहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या