बळिराजा शेतीच्या कामात व्यस्त

शिंदोडी , ता. ८ नोव्हेंबर २०१६ (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात यंदा मुबलक पाऊस झाला असल्याने बळीराजा शेती कामात व्यस्त आहेत. तर मागील वर्षी कांद्याला बाजार कमी मिळाल्याने त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी कांदा लागवडीकडे पाठ फिरवली असल्याचे चिञ दिसुन येत अाहे.

या वर्षी जून व जुलैच्या सुरवातीला पाऊस कमी होता. परंतु ऑगस्ट महिन्यात परतीच्या पाऊसाने शिरुर तालुक्याचा काही भाग वगळता सगळीकडे दमदार हजेरी लावली.त्यामुळे शेतकऱ्यांना ज्वारीच्या पेरण्याला अनुकूल वातावरण तयार झाले.
परंतु मागील वर्षी कांद्याला बाजार भाव नसल्याने शेतकऱ्यांनी अरणीत साठवलेला कांदा मात्र या पाऊसाने झोडपल्याने मोठया प्रमाणात सडला.शिरुर तालुक्यात बागायत भागात देखिल  तशीच परिस्थिती असुन सडलेल्या कांद्याचे करायचे काय ? असा सवाल शेतक-यांकडुन व्यक्त केला जात अाहे.त्यामुळे शेतकऱ्यांच मोठं आर्थिक नुकसान झालं अाहे. तसेच बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांनी कांदा विकण्यासाठी पाठवला नाही.त्यामुळे यंदा कांद्याच्या बियाणे व रोपालाही बाजारभाव नसल्याने अनेक शेतकरी ऊस लागवड करण्याला प्राधान्य देत अाहेत.

सध्या शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी कांदा लागवडी सुरु आहेत.परंतु कांद्याला बाजार नक्की किती मिळणार याचीच चिंता शेतकऱ्यांना आहे.कांद्याचा एकरी उत्पादन खर्च जास्त असतो तसेच कांद्याला बाजारभावही कमी मिळतो.त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस लागवडीला जास्त पसंती दिली असल्याचे चित्र निमोणे व आसपासच्या परिसरात दिसत आहे.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या